तरुण भारत

जपानमध्ये विदेशी शहरांच्या प्रतिकृती

देश न सोडता जपानी नागरिक करत आहेत सैर

मागील सुमारे 2 वर्षांपासून कोरोना संकटामुळे जपानमधील पर्यटक विदेशात प्रवासावर जाऊ शकलेले नाहीत. अशा स्थितीत सुमारे 30 वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्या जर्मन, डच, ब्रिटिश आणि अमेरिकन शहरांनी युक्त थीम पार्कांमध्ये आता गजबजाट दिसू लागला आहे. नागासाकी येथे निर्माण करण्यात आलेल्या डच शहरात टय़ूलिपची फुले आणि वास्तुकलेचे दृश्य दिसून येते. सुमारे 200 हेक्टर क्षेत्रफळात फैलावलेल्या या डच थीम पार्कमध्ये मागील 2 वर्षांपासून लाखो पर्यटक आले आहेत. हॉश टेन बॉश नावाचे हे डच थीम पार्क जपानमध्ये वसलेले एकमात्र विदेशी शहर नाही.

Advertisements

जपानच्या चीबा प्रांतात जर्मन शहर, माई प्रांतात स्पॅनिश शहर, फुकुशिमा प्रांतात ब्रिटिश शहर आणि ओकीनावा प्रांतात अमेरिकन शहरांच्या रेप्लिका निर्माण करण्यात आल्या आहेत. विदेशात जाऊ इच्छिणारे पण कोरोना संकट आणि कमी बजेटमुळे जाऊ न शकणाऱया जपानी पर्यटकांसाठी ही शहरे उपयुक्त आहेत. असेच एक थीम पार्क चालविणारे नाउको कुरुसावा यांनी जपानी लोकांना विदेशात जाता येत नसल्यास मग विदेशी शहर जपानमध्ये येऊ शकते असे म्हटले आहे.

विदेशी शहरांच्या रेप्लिकेमध्ये मुलांसाठी प्लेइंग एरिया, गोल्फ कोर्स, बिग व्हिल आणि संबंधित देशांच्या सर्व प्रसिद्ध गोष्टी निर्माण करण्यात आल्या आहेत. या थीम पार्कांमध्ये संबंधित देशामधील प्रसिद्ध इमारतींसह तेथील संस्कृतीची झलकही दिसून येते. तसेच त्या देशातील खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेता येत असल्याचे कुरुसावा यांचे म्हणणे आहे.

बबल इकोनॉमीचा काळ

जपानमध्ये 90 च्या दशकात बबल इकोनॉमीदरम्यान या थीम पार्कांची निर्मिती झाली होती. बबल इकोनॉमी म्हणजे त्या काळात जपानी लोकांचे उत्पन्न वाढल्याने त्यांच्यात विदेशात फिरण्याची इच्छा वाढली होती. त्यानंतरच्या दशकांमध्ये जपानी पर्यटक विदेशात जाऊ लागल्यावर थीम पार्क ओसाड पडले. तर कोरोनाकाळात येथे पुन्हा लोकांचा वावर वाढला आहे.

Related Stories

ट्रम्प यांच्या टीमकडून ‘गेटर’ सादर

Patil_p

अमेरिकेत बाधितांनी ओलांडला 3 कोटींचा टप्पा

datta jadhav

भारताकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होण्याची पाकला भीती

datta jadhav

गर्दीअभावी ट्रम्प यांची दुसरी सभा रद्द

datta jadhav

कोरोना विषाणूबाबत धोक्याचा इशारा देणाऱया डॉक्टरचा मृत्यू

prashant_c

इस्लामोफोबियावर बंदी घालण्याची इम्रान खान यांची मागणी

datta jadhav
error: Content is protected !!