तरुण भारत

अमेरिकेत बास्केटबॉल @90

तरुणांसारखे चपळाईने नेटमध्ये बॉल टाकतात आजी

13 संघांमध्ये 75 महिलांचा सहभाग

Advertisements

बास्केटबॉलच्या नेटमध्ये बॉल टाकतानाचा मार्ज कार्ल या 92 वर्षीय महिलेचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यांच्याप्रमाणेच 80-90 वर्षांच्या वृद्ध महिला तेथे बास्केटबॉलवर तरुण खेळाडूंप्रमाणे तुटून पडतात. सॅन डियागो सीनियर वुमन बास्केटबॉल असोसिएशनशी संलग्न 75 महिला तेथील 13 संघांमध्ये खेळत आहेत.

दरवर्षी सॅन डियागो सीनियर गेम्स इव्हेंटमध्ये त्यांचा उत्साह पाहण्याचा अनुभव फारच वेगळा असतो. त्यांना वृद्ध महिला समजण्याची चूक करू नका, त्या गंभीरपणे खेळणाऱया सीनियर ऍथलिट असल्याचे उद्गार कार्ल यांच्या स्प्लॅश या टीमचे ट्रेनिंग कोच कर्स्टन कुमिंग्स यांनी काढले आहेत.

कार्ल या वयात देखील शिकण्यासाठी पूर्णपणे समर्पित असतात. लीगमध्ये सर्वात वृद्ध सदस्य 95 वर्षांचा आहे. अलिकडेच शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सुधारली आहे. एकदा मी प्रॅक्टिससाठी पोहोचले नव्हते, तेव्हा 80 वर्षीय खेळाडूने मला चांगलेच फटकारले होते असे कुमिंग्स सांगतात. माझ्या अनेक मैत्रिणी आता जगात नाहीत. मुलं त्यांच्या जबाबदाऱयांमध्ये अडकून पडली आहेत. अशा सिथतीत हे लीग आमच्यासारख्या महिलांना फिट राहण्यासह एकाकीपणा दूर करण्यास मदत करत असल्याचे कार्ल यांनी म्हटले आहे.

Related Stories

मेंदूवरही प्रभाव पाडतोय कोरोना विषाणू

Omkar B

काबूल विमानतळाजवळ अमेरिकेचा हवाई हल्ला

Patil_p

पाकिस्तान : कराचीजवळ प्रवासी विमान कोसळले

datta jadhav

ब्रिटनने दिली फायझर-बायोटेकच्या लसीला मंजुरी

datta jadhav

अमेरिका : 1,561 बळी

Patil_p

अमेरिकेत 30 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav
error: Content is protected !!