तरुण भारत

अमेरिकेत निरपराधाला मिळाला न्याय

गुन्हय़ाशिवाय 43 वर्षे तुरुंगात राहिले पेविन

मुक्ततेनंतर 20 हजार जणांकडून 11 कोटींची मदत

Advertisements

‘उशिरा का असेना पण न्याय मिळाला’. अमेरिकेत मिसौरीच्या तुरुंगात कैद केविन स्ट्रिकलँड मागील आठवडय़ात मुक्त झाले. त्यांना 3 जणांच्या हत्येच्या गुन्हय़ासाठी शिक्षा ठोठावण्यात आली होती. पण त्यांनी या हत्या केल्या नव्हत्या. गुन्हा केला नसतानाही त्यांना 40 वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगात घालवाव लागला. आता दोषमुक्त झाल्यावर अज्ञात लोकांनी त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ऑनलाईन मोहीम चालविली आहे. समाजात पुन्हा सन्मानपूर्वक स्वतःचे जीवन व्यतित करता यावे यासाठी चालविली जाणारी मोहीम आता यशस्वी ठरतेय. सुमारे 20 हजार लोकांनी त्यांच्याकरता आतापर्यंत 14.5 लाख डॉलर्स (सुमारे 10.7 कोटी रुपये) जमविले आहेत.

स्ट्रिकलँड यांना दोषी ठरविण्यासाठी पुरेसे पुरावे नव्हते असे मिसौरीच्या न्यायालयाला आढळून आले होते. निर्णय बदलल्यावरही केविन भरपाईसाठी पात्र नाहीत. प्रशासन चुकीच्या निर्णयामुळे शिक्षा भोगणाऱया केवळ अशाच लोकांना भरपाईची अनुमती देतो, ज्यांना डीएनए पुराव्यांच्या माध्यमातून दोषमुक्त करण्यात आले आहे.

1978 मध्ये झालेल्या संबंधित हत्यांशी माझे कुठलेच देणेघेणे नव्हते. घटनेवेळी मी घरी टीव्ही पाहत होतो. गोळीबारात बचावलेल्या मुख्य साक्षीदाराने अनेक वर्षे स्वतःची साक्ष टाळण्याचा प्रयत्न केला. पोलीस दडपण आणत असल्याचे साक्षीदाराचे म्हणणे होते. पण आता मुक्तता झाल्याने मी देवाचा ऋणी असल्याचे स्ट्रिकलँड म्हणाले.

ओळखपत्रच नाही

केविन यांच्या मुक्ततेनंतर देणगी जमविण्यासाठी मिडवेस्ट इनोसेंस प्रोजेक्टचे रोजो बुशनेल यांनी मोहीम चालविली आहे. केविन यांच्याकडे बँक खाते, फोन नंबर किंवा ओळख दर्शविणारे सरकारी दस्तऐवज नाही. सध्या ते स्वतःच्या भावाच्या घरी राहत आहेत. त्यांना लवकरच मदतनिधी मिळणार असल्याचे बुशनेल म्हणाले.

Related Stories

रशियात कोरोना संकट गडद

Patil_p

अमेरिका : भीतीदायक आकडा

Patil_p

पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची इस्रायलकडून चौकशी

Patil_p

कोरोनाचा नवा वॅरियंट चिंताजनक

Patil_p

भारताची लोकसंख्या एक अब्ज ३०० कोटी- इम्रान खान

Abhijeet Shinde

टांझानिया झाला कोरोनामुक्त

datta jadhav
error: Content is protected !!