तरुण भारत

अजय देवगणच्या चित्रपटाला नवे शीर्षक

‘मे-डे’ ऐवजी नव्या नावाने चित्रपटगृहांमध्ये येणार चित्रपट

अजय देवगणकडून दिग्दर्शित चित्रपट ‘मे-डे’चे शीर्षक प्रदर्शनापूर्वी बदलण्यात आले आहे. चित्रपट आता ‘रनवे 34’ या शीर्षकासह चित्रपटगृहांमध्ये 29 एप्रिल रोजी झळकणार आहे. या चित्रपटाचा निर्माता तसेच दिग्दर्शक अजय देवगण हाच आहे. त्यानेच चित्रपटाच्या पहिल्या पोस्टर्ससह याच्याशी निगडित माहिती शेअर केली आहे.

Advertisements

चित्रपटाच्या फर्स्ट लुक पोस्टर्सवर अजय देवगण, अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंह यांच्या व्यक्तिरेखा दर्शविण्यात आल्या आहेत. अजय आणि रकुल चित्रपटात वैमानिकाच्या भूमिकेत आहेत. रनवे 34 हा सत्य घटनांवर प्रेरित चित्रपट आहे. हा एक इमोशनल आणि हाय ओक्टेन थ्रिलर चित्रपट असल्याचे अजयने म्हटले आहे.

रनवे 34 हा अजयच्या कारकीर्दीतील तिसरा दिग्दर्शकीय चित्रपट आहे. त्याने 2008 मध्ये ‘आय यू मी और हम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अजयने त्यानंतर ‘शिवाय’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. रनवे 34 हा चित्रपट दोहा येथून कोची येथे जात असलेल्या विमानासोबत घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. ही घटना 2015 मध्ये घडली होती. चित्रपटात अंगिरा धर वकिलाच्या भूमिकेत तर आकांक्षा ही अजयच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.

Related Stories

करण जौहरच्या ‘दोस्ताना 2’ मधून कार्तिक बाहेर

Patil_p

झी पहिल्या क्रमांकाचे चॅनेल

Patil_p

तब्बूचे इन्स्टाग्राम अकौंट हॅक

Patil_p

बॉलिवूड नव्हे उद्योगक्षेत्रात पाऊल ठेवणार

Patil_p

335 डेटवर जाऊनही शोध अपूर्णच

Amit Kulkarni

सुशांतसिंह राजपूतचा ‘छिछोरे’ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट

Patil_p
error: Content is protected !!