तरुण भारत

ढगाळ वातावरणामुळे बळीराजाची चिंता पुन्हा वाढली…

शेतकऱयांच्या नजरा आकाशाकडे लागून, शिल्लक पिकांच्या सुगीतही संकट कायम

वार्ताहर/ किणये

Advertisements

यंदा अवकाळी पावसाने शिवारातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन सुगी हंगामातच पाऊस आल्याने हातातोंडाला आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. दोन दिवस अवकाळी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण पसरले होते. यामुळे बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे.

शनिवार व रविवार दोन दिवस पावसाने उघडीप दिली होती. यामुळे शेतकरी शिवारात शिल्लक राहिलेल्या पिकांची सुगी साधणार होते. मात्र, ढगाळ वातावरणाचे संकट कायम असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

तालुक्मयात सुगी हंगामाला प्रारंभ झाला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसाने तालुक्मयाला चांगलेच झोडपून काढले. शेतात कापणी करून ठेवलेले भातपीक पूर्णपणे पाण्याखाली गेले. तसेच भाताच्या गंज्यांमध्येही पावसाचे पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले आहे.

पावसामुळे कापणीसाठी आलेली भातपिके आडवी झाली. बहुतांशी शिवारातील भातपिकांना कोंब आले. यामुळे भातपिकांची हानी अधिक झाली आहे. सध्याही शिवारांमध्ये पाणी साचून आहे.

दोन दिवस पावसाने उघडीप दिली. यामुळे शिल्लक राहिलेल्या भातपिकांची कापणी, मळणी करून मिळेल तेवढे धान्य जमा करण्यासाठी शेतकरी धडपड करीत होता. पण सोमवारी दिवसभर हवामानात कमालीचा बदल दिसून आला. ढगाळ वातावरणामुळे पुन्हा वळीव पाऊस केव्हाही पडू शकतो, याची चिंता शेतकऱयांना लागून राहिली आहे.

अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे यंदाचा सुगी हंगामच वाया गेला असल्याने तसेच पिकांचे नुकसान झाल्यामुळे अनेक शेतकऱयांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पावसामुळे भातपिकासह सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेत-शिवारांमध्ये अजूनही पाणी साचून आहे. यामुळे रब्बी हंगामातील पेरणीची कामेही खोळंबलेली आहेत.

हरभरा, वाटाणा, ज्वारी, मसूर, मोहरी आदी पिके रब्बी हंगामात तालुक्मयामध्ये घेण्यात येतात. मात्र, रब्बीची पेरणीच झाली नाही. यामुळे मिळणारे कडधान्यही शेतकऱयांना यावषी मिळणार नाही.

अवकाळी पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली होती. यामुळे शेतकऱयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, सोमवारी पुन्हा ढगाळ वातावरण पसरल्याने कधी एकदा ढगाळ वातावरण व अवकाळीचे सावट कमी होते, असे म्हणत शेतकऱयांच्या नजरा आकाशाकडे लागून राहिल्या आहेत.

Related Stories

हिंडलगा महालक्ष्मी यात्रेला अलोट गर्दी

Omkar B

आता बेळगाव-दिल्लीसाठी 189 सीटर विमान

Amit Kulkarni

धनादेशऐवजी आता मनपाच देणार लॅपटॉप

Patil_p

राज गावडे, नितीन पाटील यांची मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni

नियमांचे पालन न केल्यास कामे करू नका

Patil_p

शाळांच्या स्वच्छतेसाठी ता.पं.कार्यकारी अधिकारी सरसावले

Patil_p
error: Content is protected !!