तरुण भारत

प्रशासनाला आली खडबडून जाग…

कावळेवाडी अंगणवाडी इमारत दुरुस्तीच्या कामाला सुरुवात- तरुण भारतमधील वृत्ताची घेतली दखल

वार्ताहर/ किणये

Advertisements

कावळेवाडी येथील अंगणवाडी शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. इमारतीला गळती लागून दरवाजा खराब झाला होता. शौचालयाचे काम अर्धवट स्थितीत होते. यामुळे पाच-दहा दिवस बालकांना या अंगणवाडीच्या इमारतीमध्ये बसविण्यात आले नव्हते. ही समस्या अत्यंत गंभीर बनली. याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले होते. या अंगणवाडी शाळेबाबत दै. तरुण भारतने आवाज उठविला आहे.

सोमवार दि. 29 रोजीच्या दै. तरुण भारतमधून कावळेवाडीच्या अंगणवाडीची समस्या काय आहे, इथल्या बालकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे, याबाबत सविस्तर वृत्त देण्यात आले. या बातमीची दखल घेत प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. सोमवारी सकाळपासूनच अंगणवाडी दुरुस्तीच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे.

कावळेवाडी गावात केवळ एकच अंगणवाडी शाळा आहे. अंगणवाडी इमारतीला गळती लागून धोकादायक बनली आहे. दरवाजा खराब झाला होता. शाळेच्या वर्गखोलीत जाण्यासाठी पायऱयाही नाहीत. त्यामुळे बालकांना शाळेच्या वर्गखोलीत जाताना त्रास सहन करावा लागत होता. शौचालयाचे काम अर्धवट स्थितीत होते. त्यामुळे बालकांची गैरसोय झाली. ग्राम पंचायत व अधिकाऱयांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष झाले होते. यामुळे ग्रामस्थ व पालकवर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.

उशिरा का होईना प्रशासनाला जाग आली आणि अंगणवाडी शाळा इमारतीच्या दुरुस्ती कामाला सुरुवात केली असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सोमवारी सकाळी शाळेचा मुख्य दरवाजा नवीन बसविण्यात आला. पाण्याची टाकी व शौचालयाची दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते.

Related Stories

बेळगाव सीए शाखेतर्फे जीएसटी चर्चासत्र

Omkar B

तिसऱया रेल्वेगेटजवळ रस्त्याची चाळण

Patil_p

बाळेकुंद्री लक्ष्मी देवीची ओटी भरणे कार्यक्रम

Amit Kulkarni

श्री अम्माभगवान सेवा समितीतर्फे विविध उपक्रम

Omkar B

कोविशिल्ड लस बागलकोटला दाखल

Amit Kulkarni

नागपंचमी सणाला उत्साहात प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!