तरुण भारत

खानापूर तालुका माजी सैनिक संघटनेची बैठक

खानापूर / प्रतिनिधी

खानापूर तालुका माजी सैनिक आर्मी, नेव्ही, एअरफोर्स संघटनेची बैठक नुकतीच संघटनेच्या कार्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी कॅ. पांडुरंग मेलगे उपस्थित होते.

Advertisements

सेक्रेटरी धाकलू हेब्बाळकर यांनी स्वागत करून बैठकीचा उद्देश विशद करून मागील बैठकीचे इतिवृत्त सादर केले. अध्यक्ष कॅ. पांडुरंग मेलगे यांनी संघटनेच्या सर्व सदस्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करत आपल्या जवळपास असलेल्या सर्व माजी सैनिकांना संघटनेत सामील करुन घ्यावे, असे सांगितले.

यावेळी कार्याध्यक्ष सुभेदार गोपाळराव देसाई म्हणाले, मणिपूरमध्ये कर्नल विफ्लव त्रिपाठी व पत्नी अनुजा, मुलगा आविर व इतर चार जवान उग्रवादींच्या हल्ल्यामध्ये शहीद झाले. ते आसाम राईफल्स बटालियनचे कमाडिंग ऑफीसर होते. ही  अतिशय दुःखद घटना असल्याचे त्यांनी सांगितले.

हवालदार सुरेश पवार, पांडुरंग पवार या दोघांची संघटनेत सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी ऑ. कॅ. प्रकाश माळवे यांनी आभार मानले.

Related Stories

केदनूर येथील काटलक्ष्मी देवीची यात्रा उद्यापासून

Amit Kulkarni

कुमसगी क्रॉसजवळ घुबड जप्त

Patil_p

कणबर्गी येथे किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

Patil_p

चन्नम्मा पथकाकडून कोरोनाविषयक जागृती

Rohan_P

दिव्यांग व्यक्तींनी केली मतदानाची जनजागृती

Omkar B

कर्नाटक एसएसएलसीचा निकाल सोमवारी जाहीर होणार: शिक्षणमंत्री

Abhijeet Shinde
error: Content is protected !!