तरुण भारत

शाळा आवारात साकारल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती

शिक्षकांच्या सहकार्यातून ठळकवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

गड, किल्ले नेहमीच इतिहासाची साक्ष देतात आणि देशप्रेमासाठी स्फूर्ती देतात. म्हणूनच तर दिवाळीच्या निमित्ताने किल्ले तयार केले जातात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व आदर्श जपण्यासाठी या प्रतिकृती साकारल्या जातात. शहरात ठिकठिकाणी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. ठळकवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात चार किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत.

इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका एस. टी. पाटील व व्ही. डी. करेगार यांच्या मार्गदर्शनाखाली व सौरभ हुंबरवाडी याच्या नेतृत्वाखाली पन्हाळा गड तयार केला. आठवीच्या विद्यार्थ्यांनी के. एम. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल, शहापूरकर आणि सहकाऱयांनी जंजिरा किल्ला तयार केला. नववीच्या विद्यार्थ्यांनी विलास खटावकर व एस. एन. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार जाधव, शिवम चौगुले, अंकुश शिंदे आणि सहकाऱयांनी सिंहगड किल्ल्याची प्रतिकृती केली. नववी ब च्या विद्यार्थ्यांनी एस. एस. कोष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली यश होसूरकर आणि सहकाऱयांनी पद्मदुर्ग साकारला आहे. त्यांना शिक्षक विवेक पाटील, आंबेवाडीकर व साहाय्यक निखिल राऊळ, परशराम वांगेकर यांचे सहकार्य लाभले.

एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर, व्हा. चेअरमन एस. वाय. प्रभू, मुख्याध्यापक आर. आर. कुडतुरकर यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांनी या प्रतिकृती तयार केल्या आहेत. लोकमान्य संस्था, भगवे वादळ युवक संघटना यांच्या पदाधिकाऱयांनी किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहून विद्यार्थ्यांची प्रशंसा केली.

Related Stories

शुक्रवारी 103 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

‘त्या’ बालकावर अखेर अंत्यसंस्कार

Patil_p

शिक्षिका फर्नांडिस यांचा सत्कार

Amit Kulkarni

हलशीवाडीत 5 डिसेंबरपासून क्रिकेट स्पर्धा

Amit Kulkarni

‘लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी’ लोकसेवेसाठी रुजू

Patil_p

खानापूर तालुक्यात आणखी चौघांची भर

Rohan_P
error: Content is protected !!