तरुण भारत

सरसंघचालक मोहन भागवत आज कोल्हापुरात

विविध उपक्रम आणि प्रकल्पांचे उद्घाटन

कोल्हापूर / प्रतिनिधी

येथील कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची बैठक तीन दिवस चालणार आहे. या बैठकीसाठी सरसंघचालक मोहन भागवत आज मंगळवारी कोल्हापुरात येणार असून ते या बैठकीलाही उपस्थित राहाणार आहेत. दरम्यान, भागवत यांच्या हस्ते सिद्धगिरी मठावरील गर्भसंस्कार केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, गोमय रंगनिर्मिती प्रकल्प, शिल्पशाळा या प्रकल्पांचे उद्घाटन केले जाणार आहे. मंगळवारी (दि. 30) सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होईल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक वर्षातून तीन ते चार वेळा होत असते. या वर्षी ही बैठक कणेरी येथील सिद्धगिरी मठावर आयोजित केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी, सहसरकार्यवाह कृष्णगोपाल, डॉ.मनमोहन वैद्य, अरुणकुमार, सुरेश सोनी, रामदत्त आदी कार्यकारीणीतील पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत. या बैठकीमध्ये वर्षभरातील संघाच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच पुढील वर्षी करण्यात येणाऱ्या संघटनात्मक कामाचे नियोजनही केले जाईल. 2025 साली संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त प्रत्येक विभागामध्ये काय कार्यक्रम घ्यायचे याचेही नियोजन या बैठकीत करण्यात येईल. अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचार विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान आज मंगळवारी (दि. 30) सायंकाळी 6 वाजता सिद्धगिरी मठावर गर्भसंस्कार केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, गोमय रंगनिर्मिती प्रकल्प, शिल्पशाळा या प्रकल्पांचे उद्घाटन मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी काडसिद्धेश्वर स्वामी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत.

Advertisements

Related Stories

ऊस तोडणी कामगारावर खूनी हल्ला

Abhijeet Shinde

अवजड वाहन वापराच्या नियमात बदल

Abhijeet Shinde

कणेरी येथे प्रदूषण मुक्त दीपोत्सव साजरा

Abhijeet Shinde

कुंभोज येथे महाविकास आघाडीच्या स्मिता चौगुले बिनविरोध

Abhijeet Shinde

कुंभी कासारी कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ शुगरचा सर्वोच्च साखर उतारा पुरस्कार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : तब्बल पाच दिवसानंतर करवीर तालुक्यातील गावांमध्ये लाईट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!