तरुण भारत

खाणीत अडकलेले कामगार 65 तासांनंतर बाहेर

बोकारो / वृत्तसंस्था

जवळपास तीन दिवस कोळशाच्या खाणीत अडकलेल्या चार कामगारांची सुखरुप सुटका झाली आहे. सोमवारी सकाळी ते खाणीबाहेर पडले. त्यांनी अडकलेल्या जागेपासून आपला मार्ग बाहेरपर्यंत खणून काढला आणि स्वतःची सुटका करुन घेतली. तुटपुंजे अन्न आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव यांच्याशी झुंजत त्यांनी आपला जीव वाचविला. त्यांच्या निर्धाराचे कौतुक होत आहे.

Advertisements

लक्ष्मण राजवर, रावण राजवर, आनंदी सिंग आणि भरत सिंग अशी त्यांची नावे आहेत. खाणीत झिरपणारे पाणी पिऊन त्यांनी 3 दिवस तग धरला. ही घटना भारत कोकींग कोल लिमिटेडच्या एका बंद झालेल्या खाणीत घडली. ही खाण बंद झाल्यानंतर येथे बेकायदा खाणकाम काही लोकांनी सुरु केले होते.

या कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यांना खाणीत शिरताना सुरक्षा साधनेही देण्यात आली नव्हती. झारखंडमध्ये अशा अनेक बेकायदा खाणी असून तेथे असे अपघात नेहमी होत असतात. त्यामुळे तेथील राज्य सरकारने अशा बेकायदा खाणींवर बंदी घालून कामगारांना धोक्यापासून वाचवावे, अशी मागणी होत आहे. कालीमातेच्या कृपेमुळेच आम्ही वाचलो, अशी भावना या वाचलेल्या कामगारांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Related Stories

चर्चेदरम्यान चीनने वाढविले सैनिक

Patil_p

सहाव्या टप्प्याच्या मतदानावेळी विशेष खबरदारी

Patil_p

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाळ राय यांना कोरोनाचा संसर्ग

Rohan_P

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची कोरोनावर मात

Rohan_P

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ही उतरणार भारतीय मैदानात?

datta jadhav

6 महिन्यांत 175 वायू गुणवत्ता केंद्रे स्थापन करा

Patil_p
error: Content is protected !!