तरुण भारत

ओमिक्रॉन’पासून दक्षतेसाठी गाईडलाईन्स

‘जोखीम’ श्रेणीतील देशांमधून येणाऱया प्रवाशांना आरोग्य चाचणी सक्तीची

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढल्यानंतर आता केंद्र सरकारने नवी नियमावली जारी करत संशयितांवर कडक नजर ठेवण्याचे नियोजन केले आहे. सुधारित गाईडलाईन्सनुसार, संसर्गाचा धोका असणाऱया देशांमधून येणाऱया नागरिकांना भारतात येण्यासाठी प्रवास सुरु करण्यापूर्वी 72 तास आधी कोरोना चाचणी करणे अनिवार्य असणार आहे. तसेच भारतात विमानतळावर दाखल झाल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी करावी लागणार आहे. या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱया व्यक्तींना क्वारंटाईन केले जाणार आहे. तसेच त्यांच्यावर क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.

ओमिक्रॉनने जगाची धाकधूक वाढवली असून भारतही दहशतीखाली आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण अनेक देशांमध्ये आढळल्यानंतर प्रत्येक देशांनी सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. अनेक देशांनी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. संसर्गाचा धोका असणाऱया देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणे अनिवार्य असणार आहे. याशिवाय, त्यांचे नमुने संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंगसाठी दिले जातील. विमानतळावर कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. त्यानंतर भारतात आल्यानंतर आठव्या दिवशी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येईल. त्यानंतर 7 दिवस सेल्फ मॉनिटरिंग करावे लागणार आहे. विमान प्रवासासाठी तिकीट बुक करताना विमान कंपन्याना हमी द्यावी लागणार आहे. त्याशिवाय, मागील 15 दिवसांच्या प्रवासाची माहिती विमान कंपन्यांनी ई-मेलद्वारे घ्यावी, अशी प्रशासनाने सूचना केली आहे. मागील 15 दिवसांमध्ये आफ्रिकन देशांमध्ये प्रवास केल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने सात दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. विलगीकरणासाठी हॉटेल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थात्मक विलगीकरणाच्या कालावधीनंतरही 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे

‘जोखीम’ देशांमध्ये समाविष्ट 12 देश...

केंद्र सरकारने नवीन कोरोना प्रकाराचा धोका जास्त असलेल्या 12 देशांची यादी तयार केली आहे. या देशांमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायलसह युरोपातील सर्व देशांचा समावेश आहे.

Related Stories

जम्मू विमानतळावर दोन स्फोट

datta jadhav

‘पॅडल फॉर हेल्थ’ मोहिमेस केंद्रीय मंत्र्यांकडून प्रारंभ

Patil_p

भारतविरोधी द्वेषभावना पाकिस्तानच्या अंगलट

Patil_p

सोन्याचांदीसह जयललितांच्या घरातील 32 हजार 721 वस्तू तामिळनाडू सरकारच्या ताब्यात

datta jadhav

राजस्थान : कॅबिनेट मंत्री प्रताप खाचरियावास यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

लाई लामांचे 86 व्या वर्षात पदार्पण

Patil_p
error: Content is protected !!