तरुण भारत

राज्यात लॉकडाऊनचा प्रस्ताव नाही

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisements

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तरी देगील जनतेमध्ये याविषयी धास्ती निर्माण झाली आहे. दरम्यान, लॉकडाऊनची चर्चा रंगत असल्याने मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात लॉकडाऊन जारी करण्याचा प्रस्ताव नाही. शाळा-महाविद्यालयांवर लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. ते बंद ठेवण्याबाबत कोणत्याही प्रकारची सूचना वा आदेश दिलेला नाही, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी स्पष्ट केले आहे.

दावणगेरे येथे सोमवारी पत्रकारांशी ते बोलत होते. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटबाबत भीती न बाळगता जनतेने मार्गसूचीचे काटेकोर पालन करण्यावर भर द्यावा. नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आलेल्या देशातून येणारया प्रवाशांवर अधिक लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांची विमानतळावरच तपासणी करून आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आल्यानंतरच बाहेर सोडले जात आहे. केरळमधून राज्यातील कोणत्याही जिल्हय़ात येणाऱयांना आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल आणि 7 दिवसांनी पुन्हा कोविड चाचणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनांना सूचना दिल्या आहेत. राज्य सरकार सातत्याने तज्ञ आणि केंद्र सरकारच्या संपर्कात आहे, असे ते म्हणाले.

 दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीमध्ये डेल्टा व्हेरिएंटपेक्षा भिन्न प्रकारची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे त्यांचे स्वॅब जिमोन सिक्वेन्सिंगसाठी आयसीएमआरकडे पाठवून देण्यात आले आहे. तेथून अहवाल आल्यानंतर त्या व्यक्तीला कोणत्या व्हेरिएंटची बाधा झाली आहे, अहे स्पष्टपणे समजू शकेल.

बुस्टर डोस देता येतो का, याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. मात्र, अद्याप तेथून हिरवा कंदील मिळालेला नाही. अलीकडचे आरोग्य कर्मचाऱयांनी लसीचा दुसरा डोस घेऊन 60 दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. केंद्र सरकारच्या मार्गसूचीनुसार पुढील पावले उचलण्यात येतील, असे बोम्माई यांनी सांगितले.

Related Stories

कर्नाटक: पर्यटन मंत्री सी. टी. रवी यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

Abhijeet Shinde

कर्नाटक: सरकारकडून महामंडळांसाठी अध्यक्षांची नेमणूक

Abhijeet Shinde

कर्नाटक: राज्यात लवकरच ‘राईस एटीएम’ सुविधा

Abhijeet Shinde

बेंगळूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अनिश्चित काळासाठी रद्द

Abhijeet Shinde

कर्नाटकात मंगळवारी ३ हजार १०४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!