तरुण भारत

अमेरिकेपूर्वी भारताकडे असणार सूडो सॅटेलाईट

शशात्रूदेत 200 किमीपर्यंत राहणार नजर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

ड्रोनद्वारे लढल्या जाणाऱया लढाईसाठी आभासी (सूडो) उपग्रह महत्त्वाचा ठरणार आहे आणि भारत पुढील दोन वर्षांमध्ये याचा पहिला प्रोटोटाइप प्रदर्शित करणार आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिकल्स लिमिटेड (एचएएल) यावर काम करत आहे. हाय अल्टीटय़ूट सूडो उपग्रहाद्वारे (एचएपीएस) अनमॅन्ड एअरक्राफ्ट आणि कन्व्हेंशनल सॅटेलाईटमधील गॅप भरून काढली जाणार आहे. हा उपग्रह 200 किलोमीटर अंतरावरून शत्रूवर नजर ठेवू शकेल. केवळ संरक्षणाच्या उद्देशाने नव्हेतर जियोलॉजिकल सर्व्हिस, आपत्ती व्यवस्थापनासाठीही याचा वापर करता येणार आहे.

एचएएल व्यतिरिक्त फ्रान्स आणि अमेरिकेची प्रत्येक एक कंपनी या तंत्रज्ञानावर काम करत आहे. पण भारत या दोन्ही कंपन्यांपूर्वी हा प्रोटोटाईप तयार करू शकेल अशी अपेक्षा एचएएलला आहे. 

एचएपीएसचा पहिला प्रोटोटाईप याच्या खऱया आकाराच्या एक तृतीयांश इतका असणार आहे. हा सुमारे 70 फुटांचा असून अंतिम प्रोटोटाईम तयार करण्यास काही वर्षे लागतील. पहिला प्रोटोटाईम विकासाच्या टप्प्यात आहे. याला विकसित करण्यास 700 कोटी रुपये खर्च होणार आहेत. हा उपग्रह शत्रूच्या भागात न शिरता 200 किलोमीटरपर्यंत नजर ठेवू शकणार आहे. यात 30-35 किलो पेलोड नेण्याची क्षमता असेल. तर फ्रान्स आणि अमेरिकेच्या कंपनीकडून तयार होणाऱया प्रोटोटाईपमध्ये वजन क्षमता 15 किलो इतकी असल्याचे एचएएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाकडून सांगण्यात आले.

एचएपीएसचे वजन सुमारे 500 किलो असणार आहे. हा उपग्रह सौरऊर्जेने संचालित हेणार असून तो 70 हजार फुटांच्या उंचीवर उड्डाण करणार आहे. या उपग्रहाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी 24 तास लागतील आणि तो 3 महिन्यांपर्यंत तेथे राहू शकतो.

एचएपीएसचे लाभ

हा उपग्रह पारंपरिक उपग्रहापेक्षा स्वस्त असेल आणि त्याला हव्या त्या ठिकाणी स्थिरावता येणार आहे. या प्रकल्पावर एचएएलसोबत बेंगळूरमधील एक स्टार्टअप कंपनी काम करत आहे. एचएपीएस हे एचएएलच्या कम्बाइंड एअर टीमिंग सिस्टीमचा (सीएटीएस) हिस्सा आहे. हा ड्रोनद्वारे लढल्या जाणाऱया युद्धासाठी महत्त्वाचा आहे. सीएटीएसमध्ये चार हिस्से असून यात एक मदरशिप असून तो मोठा ड्रोन आहे. एचएपीस थेट मदरशिपपर्यंत माहिती पाठविणार आहे. कॉम्बॅट एअर टीमिंग सिस्टीममध्ये लढाऊ विमानासह ड्रोनची टीम तयार केली जाईल. यात ड्रोन सर्व जोखिमयुक्त कामगिरी पार पाडणार आहे. तर लढाऊ विमानाचा वैमानिक त्यांना कमांड देणार आहे.

Related Stories

हुकुमशाहीनेच घडून येऊ शकतो मोठा बदल!

Patil_p

उत्तराखंड : गेल्या 24 तासात 429 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या वापराला परवानगी द्या; झायडसची डीसीजीआयकडे मागणी

Abhijeet Shinde

दिल्लीत विकेण्ड कर्फ्यूची घोषणा

Sumit Tambekar

संशयित चिनी सैनिक ताब्यात

Patil_p

भारतात मागील 24 तासात सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण

datta jadhav
error: Content is protected !!