तरुण भारत

देशात प्रतिदिन 47.4 लाख घरगुती सिलिंडर्सची विक्री

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशात प्रतिदिन 14.2 किलोग्रॅमचे 47.4 लाख घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरांची विक्री होत असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सोमवारी राज्यसभेत लेखी उत्तरादाखल दिली आहे. एप्रिल-सप्टेंबर 2021 दरम्यान तेल विपणन कंपन्यांनी देशात पॅक्ड डेमेस्टिक आणि पॅक्ड एनडीएनई एलपीजीची अनुक्रमे 12308 टीएमटी आणि 995 टीएमटी प्रमाणाची विक्री केली. याचाच अर्थ प्रतिदिन 14.2 किलोग्रॅमचे 47.4 लाख आणि 19 किलोच्या 2.9 लाख सिलिंडरांची विक्री केल्याचे म्हटले गेले.

Advertisements

घरगुती आणि बिगरघरगुती एलपीजी सिलिंडरांममधून प्राप्त होणार महसूल दर महिन्याला बदलत राहतो. विक्रीमूल्य आंतरराष्ट्रीय तेलबाजारात उत्पादनांच्या किमती अणि चलनाच्या विनिमय दराच्या आधारावर कंपन्यांकडून अधिसूचित केले जाते. पण सरकार घरगुती एलपीजीवर 5 टक्के आणि बिगरघरगुती एलपीजीवर 18 टक्के जीएसटी आकारत असल्याची माहिती त्यांनी दिली.

घरगुती एलपीजीवरील अनुदान प्रत्येक बाजारात वेगवेगळे असते आणि बिगरअनुदानित मूल्यावर एलपीजी रीफिलच्या खरेदीवर लागू अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाते. अनुदानाचा भार सरकार उचलत असल्याचे मंत्री तेली म्हणाले.

Related Stories

मृत्यूंसंबंधीच्या दाव्याला रोखठोक प्रत्युत्तर

Patil_p

अत्याधुनिक ११८ रणगाडे सेनेला अर्पण

Patil_p

जालंधरचे माजी बिशप फ्रँको मुलक्कल निर्दोष

Patil_p

कोरोनाला रोखण्यासाठी ‘अश्वगंधा’ प्रभावी

Patil_p

पंजाबमधील कोरोना : सद्य स्थितीत 8,829 ॲक्टिव्ह रुग्ण

Rohan_P

निकिता तोमर हत्या; दोघे आरोपी दोषी

Patil_p
error: Content is protected !!