तरुण भारत

पाकला विजयासाठी 93 धावांची गरज

वृत्तसंस्था/ चित्तगाँग

येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी पाकचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बांगलादेशने पाकला विजयासाठी 202 धावांचे आव्हान दिल्यानंतर पाकने दुसऱया डावात दिवसअखेर बिनबाद 109 धावा जमविल्या. बांगलादेशच्या दुसऱया डावात पाकच्या शाहीन आफ्रिदीने 5 गडी बाद केले.

Advertisements

या कसोटीत बांगलादेशने पहिल्या डावात 330 धावा जमविल्यानंतर पाकचा पहिला डाव 286 धावात गुंडाळत बांगलादेशने 44 धावांची आघाडी मिळविली. दरम्यान, पाकच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा दुसरा डाव 56.2 षटकात 157 धावात आटोपला. बांगलादेशने 4 बाद 39 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचे शेवटचे 6 गडी 118 धावांची भर घालत तंबूत परतले. बांगलादेश संघातील पहिल्या डावातील शतकवीर लिटॉन दासने एकाकी लढत देत 89 चेंडूत 6 चौकारांसह 59 धावा झळकविल्या. यासीर अलीने 72 चेंडूत 6 चौकारांसह 36, सैफ हुसेनने 3 चौकारांसह 18, मुशफिकुर रहीमने 2 चौकारांसह 16, मेहदी हसनने 1 चौकारासह 11 तर नुरुल हसनने 3 चौकारांसह 15 धावांचे योगदान दिले. पाकतर्फे शाहीन आफ्रिदी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 32 धावात 5 गडी बाद केले. हसन अलीने 52 धावात 2 तर साजिद खानने 33 धावात 3 बळी मिळविले.

पाकला विजयासाठी बांगलादेशने 202 धावांचे आव्हान दिले. अबिद अली आणि अब्दुल्ला शफीक या सलामीच्या जोडीने पाकच्या दुसऱया डावाला भक्कम सुरुवात करून दिली. या जोडीने दिवसअखेर 33 षटकात बिनबाद 109 धावा जमविल्या. अबिद अली 105 चेंडूत 6 चौकारांसह 56 तर अब्दुल्ला शफीक 93 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 53 धावांवर खेळत होते. या सामन्यातील खेळाचा एक दिवस बाकी असून मंगळवारी पाकचा संघ बांगलादेशवर मोठा विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यापूर्वी या दोन संघांमध्ये दहा सामने झाले असून बांगलादेशला एकाही सामन्यात पाकचा पराभव करता आलेला नाही. बांगलादेशचा यासीर अली दुखापतीमुळे निवृत्त झाला.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश प. डाव- सर्वबाद 330, पाक प. डाव- 286, बांगलादेश दु. डाव- 56.2 षटकात सर्वबाद 157 (लिटॉन दास 59, यासीर अली 36, मुशफिकुर रहीम 16, सैफ हुसेन 18, नुरुल हसन 15, शाहीन आफ्रिदी 5-32, साजिद खान 3-33, हसन अली 2-52), पाक दु. डाव- 33 षटकात बिनबाद 109 (अबिद अली खेळत आहे 56, अब्दुल्ला शफीक खेळत आहे 53).

Related Stories

भारतीय महिला फुटबॉल संघ ढाक्यात दाखल

Patil_p

श्रीनु बुगथा, सुधा सिंग दिल्ली मॅरेथॉन विजेते

Patil_p

खोटय़ा वयाच्या दाखल्याची कबुली देणाऱया क्रिकेटपटूंना शिक्षा नाही

Patil_p

मुष्टियोद्धा विनोद तनवर कोरोनाबाधित

Patil_p

बोपण्णा-रामकुमार उपांत्य फेरीत, सानिया पराभूत

Patil_p

बांगलादेश तिसऱया दिवसअखेर 83 धावांनी आघाडीवर

Patil_p
error: Content is protected !!