तरुण भारत

दुचाकी अपघातात वॉर्नला दुखापत

वृत्तसंस्था/ मेलबर्न

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याला रविवारी दुचाकी अपघातात दुखापत झाली आहे. ही दुखापत तशी गंभीर नसून तो लवकरच पुन्हा तंदुरुस्त होईल, असे सांगण्यात आले.

Advertisements

52 वषीय शेन वॉर्न आणि त्याचा मुलगा जॅक्सन रविवारी दुचाकीवरून जात असताना हे वाहन अचानक घसरले. शेन वॉर्नला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याच्या पायाच्या हाडाला दुखापत झाली असून त्याला काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल, असा अंदाज आहे. आगामी ऍशेस मालिकेपूर्वी वॉर्न पुन्हा समालोचनासाठी सज्ज राहील, असे ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमाने सांगितले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेला 8 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. शेन वॉर्नने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 145 कसोटीत 708 बळी मिळविले आहेत. जगातील तो एक अव्वल दर्जाचा फिरकी गोलंदाज म्हणून ओळखला जातो.

Related Stories

अष्टपैलू क्रिकेटपटू युसूफ पठाण निवृत्त

Patil_p

ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात डळमळीत सुरूवात

Patil_p

मुंबईच्या विजयात कर्णधार अय्यरचे शतक, धवलचे पाच बळी

Patil_p

अर्जेंटिनाचा उरूग्वेवर निसटता विजय

Patil_p

ओडिशा एफसी संघात 6 विदेशी खेळाडू

Patil_p

डेव्हिस चषक : जर्मनी उपांत्य फेरीत

Patil_p
error: Content is protected !!