तरुण भारत

पोर्तुगालच्या फुटबॉलपटूंना ओमिक्रॉनची लागण

वृत्तसंस्था/ टोकियो

कोरोना महामारीच्या समस्येने गेल्या दोन वर्षात जागतिक स्तरावर धुमाकूळ घातल्यानंतर आता ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा विविध देशांमध्ये प्रसार झपाटय़ाने होत असल्याचे दिसून येत आहे. पोर्तुगालच्या फुटबॉलपटूंनाही याची लागण झाली असून संघातील 13 जणांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे पोर्तुगालच्या आरोग्य विभागाने सोमवारी जाहीर केले आहे.

Advertisements

पोर्तुगालचा फुटबॉल संघ अलीकडेच दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर गेला होता. पोर्तुगालमधील व्यावसायिक फुटबॉल क्लबचे फुटबॉलपटू या दौऱयात सहभागी झाले होते. ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळला. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर गेलेल्या पोर्तुगालच्या फुटबॉलपटूंची नव्याने कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये 13 जणांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. या सर्व फुटबॉलपटूंना काही दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशी पर्यटकांना पोर्तुगालने प्रवेश बंदी केली आहे.

Related Stories

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पैलवान अप्पालाल शेख यांचे निधन

Abhijeet Shinde

वेटलिफ्टिंग फेडरेशनचा चिनी उपकरणांवर बहिष्कार

Patil_p

जेमिमा रॉड्रिग्जचे सलग दुसरे अर्धशतक

Patil_p

नायजेरियन फुटबॉलपटू इनोबेखेरीचा ईस्ट बंगालशी करार

Patil_p

मुंबई संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे

Patil_p

विंडीजच्या विजयात सिमन्सची चमक

Patil_p
error: Content is protected !!