तरुण भारत

ऑस्ट्रेलियन स्पर्धा जोकोविचला हुकण्याची शक्यता

वृत्तसंस्था/ मेलबर्न

येत्या जानेवारी महिन्यात येथे सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत सर्बियाचा टॉप सीडेड टेनिसपटू नोव्हॅक जोकोविच सहभागी होण्याची शक्मयता कमी असल्याचे सांगण्यात आले.

Advertisements

कोरोनासंदर्भातील ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटचा प्रसार अनेक देशांमध्ये होत असल्याने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा आयोजकांनी कोरोनासंदर्भातील नियम अधिक कडक करण्याचे ठरविले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱया विविध देशांच्या टेनिसपटूंना कोरोना लसीचे सक्तीकरण करण्यात आले आहे. कोरोना लस न घेतलेल्या टेनिसपटूला या स्पर्धेत प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा स्पर्धा आयोजकांनी केली आहे. कोरोनासंदर्भातील नियम अत्यंत काटेकोर झाल्याने जोकोविचचा या स्पर्धेतील सहभाग अनिश्चित असल्याचे समजते. जोकोविचने आतापर्यंत नऊवेळा ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली आहे. 2022 च्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेला 17 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे.

Related Stories

पंजाबसाठी आजचा सामना ‘जिंकू किंवा मरू’

Patil_p

भारताचे आणखी तीन मुष्टियोद्धे अंतिम फेरीत

Patil_p

प्रसंगी रिक्त स्टेडियममध्ये आयपीएल खेळवा

Patil_p

गौतम गंभीर लखनौ संघाचा मेंटर

Patil_p

द.आफ्रिकेचा एका धावेने रोमांचक विजय

Patil_p

सुमित मलिक बंदीविरोधात दाद मागणार

Patil_p
error: Content is protected !!