तरुण भारत

झुंजार खेळ करूनही भारतीय महिला पराभूत

महिलांची आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा – चिलीकडून 0-3 गोलफरकाने हार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

मॅनॉस, ब्राझील येथे सुरू असलेल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील दुसऱया सामन्यात भारतीय महिला संघाला झुंजार प्रदर्शन केल्यानंतरही चिलीकडून 0-3 अशा गोलफरकाने पराभव स्वीकारावा लागला.

स्ट्रायकर मारिया उरुतियाने पूर्वार्धात गोल नोंदवून चिलीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर उत्तरार्धात अखेरच्या टप्प्प्यात चिलीने आणखी दोन नोंदवून भारताचा परतीचा मार्ग बंद केला. भारताने या सामन्यात स्टार्टिंग लाईनअपमध्ये तीन बदल केले. एम. लिन्टोइनगाम्बी देवीला ब्राझीलविरुद्ध खेळलेलल्या आदिती चौहानच्या जागी तर मार्टिना थॉकचोम व मनीषा पन्ना यांना कमला देवी व दांगमेइ ग्रेस यांच्या जागी स्थान देण्यात आले.

ब्राझीलविरुद्ध गोल नोंदवणाऱया मनीषा कल्याणला भारताचा गोल नेंदवण्याची पहिली संधी मिळाली होती. सहाव्या मिनिटाला एका इनस्विंग कॉर्नरवर तिला चेंडू ताब्यात मिळाला होता. पण तिने मारलेला जोरदार फटका थेट गोलरक्षक एन्डलरच्या हातात गेल्याने भारताची ही संधी वाया गेली. यानंतर चिलीने खेळावर नियंत्रण मिळवित 12 व्या मिनिटाला पहिली संधी मिळविली. उजव्या बगलेतून मारिया रॉजसने जवेरिया टोरोकडे क्रॉसपास पुरविला. तिने बॅकहिल फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या लिन्थोईने तिला रोखण्यात यश मिळविले. मात्र पुढच्याच मिनिटाला रॉजसने चिलीचे खाते खोलण्याची संधी मिळवून दिली. तिने उजवीकडून आगेकूच करीत उरुतियाला पास पुरविला, तिने जोरदार फटक्यावर चेंडू अचूक जाळय़ात मारला. उर्वरित वेळेत भारताच्या बचावफळीने चिलीला आणखी आघाडी वाढवू दिली नाही.

प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचा अंदाज आल्यानंतर दुसऱया सत्रात भारताने आक्रमक आणि धोकादायक खेळ करीत चिलीवर दडपण आणले. 66 व्या मिनिटाला मनीषाने प्रतिआक्रमणात आगेकूच करीत बदली खेळाडू दांगमेई ग्रेसकडे चेंडू सोपविला. पण ग्रेसचा फटका एन्डलरने अचूक अडविल्याने भारताची ही संधीही वाया गेली. भारताचे आक्रमण पुढेही चालूच राहिले. मात्र चिलीने दोन मिनिटांच्या फरकाने आणखी दोन गोल नोंदवून भारताच्या आशा संपुष्टात आणल्या. बदली खेळाडू इसिदोरा हर्नांडेझ व कॅरेन अराया यांनी हे गोल नोंदवले. भारताचा शेवटचा सामना व्हेनेझुएलाविरुद्ध 2 डिसेंबर रोजी होणार आहे.

Related Stories

पैलवान सुशीलकुमार रेल्‍वे सेवेतून निलंबित

Abhijeet Shinde

भारताचे आणखी तीन मुष्टियोद्धे अंतिम फेरीत

Patil_p

विंडीज संघाच्या सराव शिबिराला प्रारंभ

Patil_p

अर्जुन पुरस्कारासाठी संदेश झिंगन, बाला देवी यांची शिफारस

Patil_p

स्पर्धकांना पूर्ण वेळ मास्कची सक्ती

Amit Kulkarni

लंका दौऱ्यासाठी द्रविडकडे प्रशिक्षकपद – बीसीसीआय

Patil_p
error: Content is protected !!