तरुण भारत

के. आर. शेट्टी – बीसीसी मच्छे आज अंतिम लढत

क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव

युनियन जिमखाना आयोजित फिनिक्स मास्टर्स चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱया क्वालिफायर सामन्यात बीसीसी मच्छे संघाने  विश्रुत स्ट्रायकर संघावर पाच गडय़ानी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आनंद करडीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Advertisements

युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या दुसऱया क्वालिफायर सामन्यात विश्रुत स्ट्रायकर संघाने 20 षटकात 8 बाद 142 धावा केल्या. राहुल शिंदेने 2 षटकार 2 चौकारासह 29, कलिन पठाणने 2 चौकारासह 26, सारंग राघोचेने 2 चौकारासह नाबाद 23 धावा केल्या. बीसीसी मच्छेतर्फे प्रसाद नाकाडीने 25 धावात 4, मनोज ताशिलदार, जोतिबा गिलबिले, संदीप चव्हाण यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीसीसी मच्छे संघाने 18.4 षटकात 5 बाद 146 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. त्यात आनंद करडीने 2 षटकार, 2 चौकारासह नाबाद 41, सुनिल नायडू व अमित पाटील यांनी प्रत्येकी 2 चौकारासह 21, मनोज पाटीलने 1 षटकार, 2 चौकारासह नाबाद 19 धावा केल्या. विश्रुत स्ट्रायकर्सतर्फे प्रमोद पालेकरने 32 धावात दोन गडी बाद केले.

सामन्यानंतर  प्रमुख पाहुणे, पुरस्कर्ते हर्ष जॉन थॉमस, उर्जित स्वामी, झेवियर गोम्स यांच्या हस्ते सामनावीर आनंद करडी, इम्पॅक्ट खेळाडू प्रसाद नाकाडी, उत्कृष्ट झेल विनित आडुरकर, सर्वाधिक षटकार राहुल शिंदे यांना चषक देऊन गौरविण्यात आले.

मंगळवारी के. आर. शेट्टी किंग्स व बीसीसी मच्छे यांच्यात अंतिम सामना सकाळी 10 वा. खेळविण्यात येणार आहे. त्यानंतर बक्षिस वितरण होणार आहे.

Related Stories

इनोक्हा चोरणारी हायटेक टोळी सक्रिय

Patil_p

पोलीस आयुक्त सीमा लाटकर यांची बदली

Patil_p

वैश्यवाणी समाजातर्फे कोजागरी पौर्णिमा

Amit Kulkarni

समिती नेते बी.आय.पाटील यांचे निधन

Patil_p

महाराष्ट्रातून सीमाभागाला ‘अवैध मद्यपुरवठा’

Patil_p

विनापरवाना व्यावसायिकांकडून 30 हजारचा दंड वसूल

Amit Kulkarni
error: Content is protected !!