तरुण भारत

डेव्हिस चषक – रशिया उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ पॅरिस

रशियाने विद्यमान चॅम्पियन स्पेनचे डेव्हिस चषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. पुढील फेरीत त्यांची लढत स्वीडनविरुद्ध होणार आहे.

Advertisements

माद्रिदमध्ये झालेल्या लढतीत रशियाने रात्री उशिरा झालेला दुहेरीचा सामना जिंकून स्पेनवर विजय मिळवित त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. अस्लन कारात्सेव्ह व जागतिक पाचव्या मानांकित आंद्रे रुबलेव्ह या जोडीने स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्स व फेलिसियानो लोपेझ यांच्यावर 4-6, 6-2, 6-4 अशी मात करून गट अ मध्ये रशियाला विजयी केले. या पराभवामुळे स्पेनची गुरुवारी घरच्या मैदानावर पुढील लढत खेळण्याची संधीही हुकली. डोपिंगमुळे रशियन क्रीडा क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय निर्बंध घातले असल्याने या स्पर्धेत रशियन टेनिस फेडरेशनचा संघ या नावाने रशिया संघ खेळत आहे.

या लढतीच्या पहिल्या एकेरीत रशियाच्या रुबलेव्हवर लोपेझने विजय मिळविल्यानंतर दुसऱया एकेरीत डॅनील मेदवेदेव्हने पाब्लो कॅरोनो बुस्टावर मात करून रशियाला बरोबरी साधून दिली होती. त्यामुळे दुहेरीच्या सामन्याला निर्णायक स्वरूप प्राप्त झाले होते. रशियाने हा सामना जिंकून पुढील फेरीतील स्थानही निश्चित केले. अन्य एका लढतीत ब्रिटनने झेक प्रजासत्ताकला हरवून शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. त्यांची उपांत्यपूर्व लढत जर्मनीविरुद्ध मंगळवारी होणार आहे.

Related Stories

नेमबाजी सराव शिबिराच्या दुसऱया टप्प्याला आज प्रारंभ

Patil_p

टी.नटराजनच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया

Patil_p

पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ रद्द

Patil_p

राही सरनोबतला रौप्यपदक

Patil_p

अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा सोमवारपासून

Patil_p

रिचर्ड कॅरपझला रोड रेसचे सुवर्ण

Patil_p
error: Content is protected !!