तरुण भारत

एसटीची वाहतूक सुरु; कर्मचारी मागण्यांवर ठाम

प्रतिनिधी/ सातारा

 एसटी कर्मचाऱयांचा संप अद्याप ही सुरू असून, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तरीही परिवहन मंडळातर्फे आर्थिकहानी टाळण्यासाठी व प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये, याकरीता एसटीची सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सोमवारी ही स्वारगेट, मुंबई, कराड यादी मार्गांवर बसेस सोडण्यात आल्या. तसेच काही ग्रामीण भागत ही लालपरीची सोय करण्यात आली होती.

Advertisements

 सोमवारी एकूण 534 कर्मचारी हे आपल्या सेवेवर रूजू झाले होते. तसेच आंदोलनातील एकूण 14 कर्मचाऱयांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली. यापूर्वी काही कर्मचाऱयांना सेवा समाप्तीच्या नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. सोमवारी मात्र केवळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. एकंदरीत परिस्थिती पाहता हळू हळू प्रवाश्यांच्या सेवेकरीता दाखल होणाऱया एसटीची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे.

 खासगी शिवाशाही बरोबरच लालपरी ही सेवेकरीता दाखल झाली होती. यामध्ये सोमवारी  सातारा ते स्वारगेट 22 गाडय़ा सोडण्यात आल्या (एकूण जाऊन-येऊन 44 फेऱया), सातारा ते मुंबई 4 गाडय़ा, सातारा ते कराड 1, कराड ते स्वारगेट-1, पाटण मधुन 4 ग्रामीण भागात गाडय़ा सोडण्यात आल्या. यामध्ये कोयनानगर, कुर्सुंडी आदी गावांमध्ये या गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. तसेच महाबळेश्वर ते तापोळा मार्गावर एक एसटी सोडण्यात आली होती. ग्रामीण भागत ही एसटी सुरू होत असल्याने प्रवाश्यांकडून ही आनंद व्यक्त करण्यात येत आहे. 

Related Stories

सातारा : नरेंद्र पाटील यांनी घेतली उदयनराजेंची भेट

datta jadhav

जिह्याचा लसीकरणात विक्रम

Patil_p

शिये पाच दिवस लाॅकडाऊन : संसर्ग रोखण्यासाठी निर्णय

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात 76 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, सात जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

कुस्तीगिरांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार – दिपाली सय्यद

Sumit Tambekar

“कसं काय शेलार बरं हाय का?”, भाजप कार्यालयासमोर शिवसेनेची पोस्टरबाजी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!