तरुण भारत

पालिकांच्या शाळात किलबिलाट 1 तारेखेपासून ऐकू येणार

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनामुळे सातारा शहरातील पालिकेच्या सर्वच शाळा बंद होत्या. राज्य सरकारच्या निर्णयानुसार दि. 1 डिसेब्ंारपासून शाळा सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या सर्वच शाळांमध्ये किलबिलाट दि. 1 रोजी ऐकू येणार आहे. त्याच अनुषंगाने सोमवारी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सर्व शाळांचे मुख्याद्यपकांची बैठक घेवून सुचना दिल्या. पालिकेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझर देण्यात येणार आहे.

Advertisements

स्थायी समितीच्या सभागृहात उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी सोमवारी सकाळी शहरातील पालिकेच्या शाळांच्या मुख्याद्यापकांची बैठक घेतली. यावेळी पालिकेचे अभियंता दिलीप चिद्रे, प्रशासन अधिकारी मारुती भांगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सातारा शहरातील पालिकेच्या सर्व शाळांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये बंद होत्या. त्या शाळा राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. 1 पासून सुरु होत आहेत. आपल्या शहरात विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी पालिकेच्यावतीने सर्व तयारी करण्यात आलेली आहे. ज्या कोणत्या शाळेला अडचण भेडसावेत त्या शाळेने लगेच आम्हाला तसेच कळवावे. सर्व शाळा सॅनिटायझर करुन घेण्यात आलेल्या आहेत. आठवडय़ातून दोन वेळा शाळा सॅनिटायझर करण्यात येणार आहेत. शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यात येणार आहे. शाळेत येणाऱया प्रत्येक विद्यार्थ्यांस सॅनिटायझर आणि मास्क वाटप करण्यात येणार आहे. शाळेमध्ये सोशल डिस्टन्स ठेवून नियम पाळून शाळा भरवण्यात यावेत अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

Related Stories

बाधित वाढीने ओलांडला अडीच लाखाचा टप्पा

Patil_p

बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ तिहेरी अपघात; एक ठार

datta jadhav

सिव्हिलच्या कोविड सेंटरमध्ये पाण्याचा ठणाणा

datta jadhav

विसर्जन तळय़ाच्या ठिकाणी पालिकेकडून तयारी

Patil_p

सातारा 322 नवे रुग्ण : 32 बाधितांचा मृत्यू

Abhijeet Shinde

चंद्रकांत पाटील – राज ठाकरे यांची आज भेट; भेटीपूर्वी चंद्रकांत पाटील म्हणाले…

Rohan_P
error: Content is protected !!