तरुण भारत

कचरागाडीची जीपीएस तपासणी होणार

तरुण भारत’च्या वृत्ताने पालिकेत खळबळ, ठेकेदारास बजावली कारणे दाखवा नोटीस

कचरा गोळा करण्यासाठी पालिकेच्या कचरागाडय़ा आहेत. मात्र, पालिकेच्या कचरा गाडी चक्क सातारा शहराची हद्द सोडून बाहेर कचरा गोळा करत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन ‘तरुण भारत’ने ‘पालिकेची घंटागाडी फिरतेय हद्दीबाहेर’ या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. सदर बातमीची दखल घेऊन पालिकेकडून त्या कचरागाडीची जीपीएस तपासणी करणार आहे. तसेच त्या ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर दुसऱया बाजूला सातारा शहरात उघडय़ावर कचरा टाकणाऱयावर कारवाई करण्याकरता पालिकेच्या आरोग्य विभागाने पुस्तके छापली आहेत त्यानुसार कारवाई होणे अपेक्षित असताना पुस्तके तशीच मुकादमाकडे पडून तर उघडय़ावर कचरा टाकणारे उदंड साताऱयात आहेत. त्यांच्यावर दंड कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

Advertisements

सातारा शहरात कचरा गोळा करण्यासाठी कचरागाडय़ा आहेत. त्या कचरा गाडींना ठराविक रुट दिलेला आहे. प्रत्येक वॉर्डात कचरा गोळा करण्यासाठी त्यांना नेमले गेले आहे. त्या कचरागाडीला जीपीएस यंत्रणाही आहे म्हणतात. जर जीपीएस यंत्रणा असेल तर राजवाडा भागातील कचरा गाडी चक्क पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कचरा गोळा करताना आढळून आली. तेही एका नेत्याच्या कार्यकर्त्याच्या सांगण्यावरुन. त्यावरुन आरोग्य विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यास 20 हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे, असे समजते.

उघडय़ावर कचरा टाकणाऱयावर दंड होणार कधी?

शहरात उघडय़ावर कचरा टाकणाऱयांची संख्या मोठी आहे. कचरागाडीत कचरा न टाकता आपल्या घरातील, दुकानातील कचरा हा बाहेर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी टाकून शहराची अवस्था कचरामय अशी केली जाते. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पालिकेने गेल्या पंधरा दिवसापूर्वी जाहीरही केले होते. परंतु त्यासाठी पावती पुस्तकेही छापली गेलेली तशीच पडलेली असून कारवाई होणार कधी?, कचरा टाकणारे मात्र तसेच कचरा टाकत आहेत. विशेषतः पोवई नाक्यावरचा कचरा टाकणाऱयांवर कारवाई कधी होणार ? असा सवाल उपस्थित होत आहे.

Related Stories

किराणा दुकानदार करताहेत सोशल डिस्टन्सचे पालन

Patil_p

बार्शीत वाढले 109 रुग्ण, एकूण संख्या 295 वर

Abhijeet Shinde

सातारा : ‘आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या’

Abhijeet Shinde

राजस्थान : न्यायाधीशानेच केला लैंगिक अत्याचार

Abhijeet Shinde

पैशांसाठी अल्पवयीन मुलीचा केला तीनवेळा विवाह; चौथ्यांदा मात्र…

Sumit Tambekar

दूध दरवाढीसाठी रयत क्रांतीचे १० जूनला एल्गार आंदोलन : माजी मंत्री सदाभाऊ खोत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!