तरुण भारत

खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

प्रतिनिधी/ सातारा

भावकीतील पांडुरंग कोंडीबा वाघ यांचा खून केल्याप्रकरणी आसले (ता. वाई) येथील आरोपी गुरुदत्त तुकाराम वाघ (वय 42) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Advertisements

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पट्टी नावाच्या शिवारात शेतातील ऊस बाहेर काढण्यासाठी रस्ता करतावेळी ट्रक्टरने काम करत असताना बांध फुटला होता. या कारणावरून मयत पांडुरंग कोंडीबा वाघ आणि आरोपी गुरुदत्त हणमंत वाघ यांच्यात वादावादी व शिवीगाळ झाली होती. त्याचा राग मनात धरून दि. 18 मे 2015 रोजी 4.30 वाजण्याच्या सुमारास पांडुरंग वाघ हे बाळासाहेब हणमंत वाघ यांच्या शेताच्या जवळ रस्त्याकडेला झाडाखाली बसले होते. यावेळी गुरुदत्त वाघ याने पांडुरंग वाघ यांच्या डोक्यात लोखंडी शस्त्र मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत कमलाकर सदाशिव वाघ यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दि. 19 मे 2015 रोजी उपचार सुरू असताना पांडुरंग वाघ यांचा मृत्यू झाला.

 भुईंज पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एन. व्ही. पवार यांनी या गुह्याचा तपास करून आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या न्यायालयात या खून प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नितीन मुके व मिलिंद ओक यांनी सरकारची बाजू मांडली. त्यात एकूण पंधरा साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी दिलेली साक्ष तसेच समोर आलेला पुरावा आणि सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद पाहता गुरुदत्त तुकाराम वाघ याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Related Stories

नव्या वर्षाला जल्लोषात प्रारंभ

Patil_p

रेशन कार्डधारकांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्याचे सांगून फसविण्याचे प्रकार

Patil_p

सातारा : गणेशवाडी येथे वृद्धास मारहाण

Abhijeet Shinde

”यास”चा धोका ओळखत ममतांचा मुक्काम नियंत्रण कक्षातच

Abhijeet Shinde

सेवानिवृत्त अभियंत्यांतर्फे अभियंता दिन साजरा

Patil_p

ग्राहकाकडून स्पेअरपार्ट दुकानदारांवर गोळीबार

Patil_p
error: Content is protected !!