तरुण भारत

सोमवारी जिल्हय़ात धावल्या एसटीच्या 140 फेऱया

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यामध्ये एसटीच्या फेऱयांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आह़े सोमवारी एकूण 445 कर्मचारी कामावर हजर राहिल़े जिह्यातील विविध आगारातून एसटीच्या तब्बल 140 फेऱया सोडण्यात रत्नागिरी विभागाला यश आल़े पुढील दिवसात आणखी कर्मचारी कामावर हजर राहिल्यास आणखी फेऱया सोडण्यात येतील असे एसटीच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले आह़े

Advertisements

शासनामध्ये एसटीचे विलीनीकरण करावे यासाठी गेल्या 1 महिन्यापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत़ शासनाकडून पगारवाढ जाहीर करण्यात आल्यानंतरही विलीनीकरणाच्या मुद्यावर काही एसटी कर्मचारी ठाम आहेत़ मात्र एसटी कर्मचारी हळूहळू कामावर येण्यास देखील सुरूवात झाली आह़े रत्नागिरी विभागातील एकूण 445 कर्मचारी कामावर हजर झाल़े यामध्ये प्रशासकीय विभागातील 154 व कार्यशाळा मधील 157 कर्मचारी, 85 चालक व 49 वाहक हजर राहिले आहेत तर 46 कर्मचारी अधिकृत सुट्टीवर आहेत़

रविवारी जिल्हय़ामध्ये काही †िठकाणी एसटी गाडय़ांवर दगडफेकीच्या घटना समोर आल्या होत्य़ा असे असूनही एसटी प्रशासनाकडून सोमवारी तब्बल 140 फेऱया सोडण्यात आल्य़ा कर्मचाऱयांचे निलंबन व सेवा समाप्तीच्या कारवाईनंतरही काही कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

राजापूर आगारातील 86 कर्मचारी कामावर हजर   

राजापूर आगारातील 200 पेक्षाही अधिक कर्मचारी 8 नोव्हेंबर पासून  आंदोलनात सहभागी आहेत. आगारातील 9 कर्मचाऱयांचे निलंबन करण्यात आले असून 15 रोजंदारी कर्मचाऱयांना सेवा समाप्तीच्या नोटीसाही देण्यात आल्या. मात्र तरीही कर्मचाऱयांचा संप सुरूच आहे. शनिवारी राजापूर आगारातील 22 कर्मचारी तर गेल्या सोमवारी सुमारे 86 कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत.

कर्मचारी हजर झाल्याने राजापूर आगारातून सोमवारी सुमारे 20 फेऱया सोडण्यात आल्या. यामध्ये राजापूर हातदे, पाचल आंबा, बुरंबेवाडी, नाटे, तारळ, राजापूर जांभवली, रेल्वेस्टेशन, जैतापूर, नाटे मार्गावर फेऱया सोडण्यात आल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली आहे.

 दापोलीत ग्रामीण भागात एसटी सुरू, तरीही विद्यार्थ्यांचे हाल

दापोली आगारात संपातील काही कर्मचारी कामावर हजर झाल्यामुळे एसटी बस सेवा ग्रामीण भागांमध्ये सुरू करण्यात आली आहे. परंतु याचा फायदा विद्यार्थ्यांना होत नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेले अनेक दिवस एसटी कर्मचाऱयांच्या संपामुळे विद्यार्थी, कर्मचारी, ग्राहकांना त्रास सहन कररावा लागत आहे. आता काही फेऱया सुरु होत असल्या तरी फेऱयांच्या वेळा निश्चित नसल्याने त्यांचा लाभ घेता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

 बसेसची वाट बघत विद्यार्थी अडकले संगमेश्वर बसस्थानकात 

बसेसच्या संपामुळे अनेक विद्यार्थी आणि ग्रामस्थ ग्रामीण भागात अडकले आहेत. देवरुख आगारातून काही गाडय़ा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र बसेसची वाट बघत काही विद्यार्थी संगमेश्वर बसस्थानकात अडकून पडत आहेत. यामुळे ग्राहकांची खरेदी तसेच नागरिकांची सरकारी कामेही थांबली आहेत. रुग्णांनाही याचा त्रास होत आहे.

Related Stories

बारावी परीक्षेत यंदाही कोकण राज्यात अव्वल!

Patil_p

कळणेत अश्रूंचा फुटला बांध

NIKHIL_N

पाडलोस-केणीवाडा येथे सापडले मृत माकड

NIKHIL_N

रत्नागिरी : सिव्हीलमध्ये केवळ २०० डोस शिल्लक!

Abhijeet Shinde

माजगाव ग्रामदेवस्थान निधी समितीच्याअध्यक्षपदी आनंद सावंत

Ganeshprasad Gogate

महाविकास आघाडीची विरोधकांकडून चुकीची प्रतिमा

Patil_p
error: Content is protected !!