तरुण भारत

बँक अधिकाऱयासह पर्यटकांचा अपघातात मृत्यू

संगमेश्वर व दापोलीत दोन वेगवेगळे अपघात

वार्ताहर/ संगमेश्वर

Advertisements

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आंबेड बुद्रुक येथे रविवारी संध्याकाळी दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात बँक ऑफ इंडिया कसबा शाखेचे प्रोबीशन ऑफिसर विश्रुत सत्यम नायर यांचा मृत्यू झाला आहे. पुणे येथून दापोलीत फिरण्यासाठी आलेल्या लोकेश जांगिड या 27 वर्षिय तरुणाचा पाळंदे येथे अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास घडली.

  संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार अनुप अशोक इंदूरकर (29, असुर्डे) व विश्रुत सत्यम नायर (29, केरळ) हे दोघे बँक ऑफ इंडिया कसबा शाखेचे कर्मचारी बँकेला सुट्टी असल्याने मोटरसायकलने (एमएच 08 एवाय 7040) रत्नागिरी येथे सर्विसिंगला दिलेली मोटरसायकल आणण्यासाठी गेले होते. संध्याकाळी 5.45 च्या सुमारास रत्नागिरीहून संगमेश्वरकडे येताना हा अपघात झाला. विश्रुत नायर आंबेड बुद्रुक येथे आले असता रघुनंदन धोंडू भडेकर (आंबेड बुद्रुक, सध्या कारवांचीवाडी) यांच्या स्कूटरला (एम एच 08 एक्स 5393) धडक बसली. या अपघातात नायर याचा जागीच मृत्यू झाला तर श्रीरंग रघुनंदन भडेकर यांच्या हातापायाला दुखापत झाली आहे. दोन्ही गाडय़ांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची खबर अनुप इंदुलकर याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जांगिड व रोहन औटे हे दोघे पुणे-हडपसर येथून दापोलीमधील हर्णे याठिकाणी फिरण्यासाठी येत होते. संध्याकाळी 6 च्या सुमारास पाळंदे येथील दर्ग्यासमोर ते आले असता गाडीवरील ताबा सुटल्यामुळे त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱया वडाच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जांगिड याचा उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला.

  जखमी गाडी चालक राजेंद्र औटे याच्यावर रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दापोली पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हर्णे दूरक्षेत्रचे हेडकॉन्स्टेबल डी. पी. गोरे अधिक तपास करत आहेत.

Related Stories

वाढत्या रुग्णांसमोर ‘व्हेंटिलेटर’ कमतरतेचा प्रश्न

Patil_p

जिह्यात रूग्ण संख्येत घट, मृत्यूची चिंता कायम

Patil_p

भविष्यात अशी वादळे पश्चिम किनारपट्टीवर होतच राहतील- माधव गाडगीळ

Ganeshprasad Gogate

डाॅक्टर दिनानिमित्त लोकमान्य मल्टिपर्पजतर्फे सत्कार सोहळा

Ganeshprasad Gogate

जिल्हय़ाततील ‘इसिस’च्या हालचालींवर गुप्तचर

Patil_p

केंद्रीय पथकाकडून ‘निसर्ग’ग्रस्त दापोलीची पुन्हा पाहणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!