तरुण भारत

आंदोलन करणाऱया ट्रक मालकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सांखळी/ प्रतिनिधी

सुर्ला येथील ट्रक मालकांनी व इतरांनी सेसा वेदांता कंपनी स्थानिकांना काम द्यायचे सोडून कंपनीमार्फत मोठे ट्रक वापरून अंतर्गत काम करीत असून आम्ही फक्त धूळ खायची आमच्या व्यथा कंपनी समजून घेत नाही वारंवार कल्पना देऊनही कुणीच लक्ष देत नसल्याने सोमवारी सकाळी या भागातील काही नि  सुर्ला गेट येथे जाऊन त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली त्यानंतर तातडीने पोलीस दाखल झाले. दरम्यान रस्ता रोखल्या प्रकरणी कंपनीने पौलीसे तक्रार केली असता दुपारी सुमारे 35 स्थानिकांना पोलिसांनी डिचोली पोलीस ठाण्यात आणून ठेवले. त्यानंतर रात्री उशिरा उपजिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना नेण्यात आले. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. या संदर्भात सुर्ल गावातील ट्रक मालक व इतर यांनी आम्ही कोणताही गुन्हा केलेला नसताना आम्हाला ठाण्यात कशासाठी आणले असा सवाल केला.

Advertisements

 आमच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी या वेळी स्थानिक ट्रक मालकांनी व इतरांनी केली आम्हाला कोणतेही कलम न लावता सोडा न पेक्षा आम्ही इथेच राहू असा पवित्रा त्यांनी घेतल्याने उशिरा पर्यंत या प्रश्नी पोलीस अधिकारी व त्यांच्या बोलणी सुरू होती.

  दरम्यात माजी आमदार प्रताप गावस,  धर्मेश सागलानी खेमलो सावंत  प्रवीण ब्लेगंन लक्ष्मीकांत परब आदींनी पोलीस ठाण्यात येऊन या प्रश्नी चौकशी केली व आंदोलकांची भूमिका समजून घेतली. अनेक वर्षे स्थानिक ट्रक मालकांना काम  न देता कंपनी 24 टायसरच्या मोठय़ा गाडय़ातून वाहतूक करते ती वाहतूक ग्रामीण भागातील राडत्यावरून करणे बेकायदा आहे असेसांगीतले हा प्रश्न सिडवून स्थानिकांना काम द्यावे. कंपनी तसेच संबंधितांनी गावच्या लोकांचे हित समजून  घेत त्यांना थोडे तरी काम देऊन सहकार्य  करावे अशी मागणी केली

 ट्रक ना कामच नाही अशी अवस्था असून या संदर्भा?त मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी तातडीने  लक्ष घालून आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी. सुर्ला फर्स्ट असोसिएशन अध्यक्ष भानुदास सोन नाईक,खजिनदार रुपेश नार्वेकर,सचिव बाबल सातोडकर, सिद्देश सुर्लकर,सुरेश खोडगिण कर,रमाकांत घाडी,वसंत सातोड कर

यांनी या पूर्वी केली होती तसेचआम्ही अनेक वेळा हा प्रश्न मुखमंत्री यांच्याकडे मांडला असल्याचे सांगितले.

  पूर्वी आम्हाला  नियमित काम मिळत असे 2012 नंतर व्यवहार बंद झाले काही गाडय़ा  सुरू होत्या मध्ये बंद होते आता पुन्हा सुरू झाले तेव्हा कंपनी आपल्या  मर्जीनुसार  बाहेरील गाडय़ा आणून काम सुरू केलेअंतर्गतमाल  वाहतूक

सिल्ड काढण्यासाठी  वाहतूक केली जाते  पण स्थानिकांना  ट्रक घेतले जात नाही    या मुळे आम्ही वाहतूक अडऊन स्थानिकांना डावलण्यात येते या बाबत कंपनी आम्हाला  विश्वासात घेत नाही अशी टीका या वेळी करण्यात आली

  मागणीची दखल घेतली नसल्याने सोमवारी त्यांनी जमून या मागणीसाठी  रस्त्यावर जमले होते. या प्रश्नी रात्री उशिरापर्यंत वाटाघाटी व चौकशी सुरू होती रात्री  सर्व लोकांना उपजिल्हाधि कार्यालयासमोर हजर कसरून सोडण्यात आले.

Related Stories

अंगणवाडी सेविकांचे आता 23 पासून बेमुदत आंदोलन

Amit Kulkarni

अडवई येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग

Amit Kulkarni

राज्यात 75 वा क्रांतिदिन साजरा

Amit Kulkarni

भाजप सरकारकडून जनतेची लूट

Amit Kulkarni

ऑक्सिजन : दोशींवर कठोर कारवाई करावी

Amit Kulkarni

पर्वरी पोलीस वसाहतीतील जून्या इमारती मोडकळीस

Patil_p
error: Content is protected !!