तरुण भारत

सांखळी डॉ. हेडगेवार शाळेतर्फे ऑनलाईनद्वारे विविध सण साजरे

प्रतिनिधी/ सांखळी

डा? के.ब. हेडगेवार साखळी शाळेमध्ये यंदापासुन प्राथमिक व पुर्व प्राथमिक वर्ग सुरु झाले आहेत.लहानपणापासुनच मुलांवर ऊत्तम संस्कार व सर्व प्रकारचे चांगले शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा ध्यास घेत प्रगती पथावर चालत असलेल्या या शाळेतर्फे शैक्षणीक वर्ष सूरु झाल्या पासून आत्तापर्यंतचे सर्व सण,ऊत्सव,ऊदाः आषाढी एकादशी, गुरूपौर्णिमा,गुरु व मातृपुजन,नागपंचमी, स्वातंत्र्यदिन,रक्षाबंधन,गोकुळाष्टमी,दिव्यांची अमावास्या हे सर्व सण आभासी पध्दतीने मुलांनी ऊत्साहाने साजरे केले.

Advertisements

    श्रीगणेशचतुर्थी निमित्त प्राथमिक व पूर्व प्राथमिक वर्गाच्या मुलांसाठी स्तोत्र पठन,आरती,,गीत पठण नृत्य सादरीकरण व शिशुवाटिकेच्या मुलांसाठी गणपतीची पाच नावे सांगणे व गणपतीला वाहतात ती आपल्या परीसराततील पत्री ओळखणे व छोटि छोटी भजने पाठ करणे,तसेच “दसऱया” निमित्त मुलांना आ?ब्याच्या पानांपासुन झेंडुची फुले वापरुन तोरण बनवणे हे ऊपक्रम ठेवले होते. कोजागारी पौर्णिमे निमित्त प्राथमिक व पुर्वप्राथमिक वर्गाच्या  मुलांनी आभासी पध्दतीने कथाकथन, नृत्य,प्रार्थना,श्लोक, गीते सादर केली.

  मुलांना शाळा व शिक्षकांना भेटायची ऊत्सुकता  लागली होती व शिक्षकांना मुलांना भेटायची, म्हणून सरस्वती पूजना निमित्त मुलांना प्रत्यक्ष शाळेत बोलवुन प्रथम प्रवेश द्वारावर त्यांचे आरती दाखवुन औक्षण केले व देवीचे दर्शन घेऊन देवीच्या समोर आपली कला सादर केली या मध्ये सर्व मुलांनी ऊत्साहाने भाग घेतला. यावेळी पालकां मध्ये ऊत्साह  यावा यासाठी त्यांना आपल्या बागेतील फुले वापरुन हार बनवणे व पंचखाद्य बनवणे ही स्पर्धा घेण्यात आली होती.  सर्व पालकांनी मोठय़ा आनंदाने भाग घेतला होता.

   दिवाळीच्या सुट्टित प्राथमिक व पुर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पतंग बनवणे,पणती सजावट,पणती रंगवणे व शिशुवाटिकेच्या मुलांसाठी कापसाच्या छोटय़ा वाती वळणे व पोह्यांपासुन छोटे लाडु बनवणे जेणेकरुन त्यांच्या हाताना व्यायाम होईल असे ऊपक्रम ठेवण्यात आले होते.

      अश्या प्रकारे मुलांमध्ये ऊत्साह येण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदानंद मिशाळ सरांच्या अध्यक्षते खाली प्राथमिक व पुर्व प्राथमिक शिक्षीका कु. प्रणाली देविदास, कु. सिध्दी गावकर,सौ. राशी सावळ, व सौ पुजा विष्णु मराठे यांनी ऊत्तम प्रकारे मुलांना मार्गदर्शन केले. तसेच सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पालक वर्गाने हीरीरीने भाग घेतला.हे सर्व कार्यक्रम व्यवस्थित रीत्या घडवुन आणण्यासाठी डा?. के.ब.हेडगेवार शाळेच्या व्यवस्थापन समितीची खुप मदत झाली.

Related Stories

आंचिमच्या उद्घाटनाला सुदीप संजीव यांची उपस्थिती

Patil_p

लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांची गोवा शिपयार्डला भेट

Amit Kulkarni

गोमेकॉ सुपरस्पेशालिटीमध्ये शंभर खाटांचे उद्घाटन

Omkar B

गोवा वाचविण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याची विजय सरदेसाई यांची हाक

Patil_p

त्रिपुरा येथील व्याख्यानासाठी निरंजन निगळय़े यांची अभिनंदनीय निवड

Amit Kulkarni

‘ब्रेन डेड’ महिलेच्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण

Amit Kulkarni
error: Content is protected !!