तरुण भारत

जुने गोवेतील बेकायदा बांधकामाविरोधात अमित पालेकर यांचे बेमुदत उपोषण सुरू

प्रतिनिधी/ पणजी

 जुने गोवे येथे वारसास्थळी चाललेल्या बेकायदा बांधकामाला विरोध करण्यासाठी ऍड अमित पालेकर यांनी आपले बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हा प्रकल्प रद्द केल्याची कायदेशी प्रक्रिया ,बांधण्यात आलेला प्रकल्प जमीनदोस्त करण्यासाठी ठोस निर्णय आणि देण्यात आलेले बांधकाम परवाने रद्द केल्याचे जाहीर करत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याच त्यांनी सांगितले.

Advertisements

 सीआरझेड आणि पुरातत्व सर्वेक्षण दस्तऐवजांमध्ये ही जागा ऑर्किड मालमत्ता म्हणून वर्णन आहे. त्यामुळे या जागेवर बेकायदेशीर बांधकाम केले आहे. मी माझ्या टीमला हे प्रकरण कायदेशीर लढा देण्यसाठी सांगितले आहे. हे उपोषण राजकीय हेतूने प्रेरित नाही. मला गोव्याचे सौंदर्य जपायचे आहे आणि भावी पिढीसाठी जतन करायचे आहे. हे  आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप राजकारणी करत आहेत . जर माझे उपोषण राजकीय असते तर चर्चजवळ बसलेल्या लोकांनी मला समर्थन दिले नसते,  असे पालेकर म्हणाले.

  बंगला बांधण्यासाठी पंचायत आणि टीसीपीची परवानगी आवश्यक होती. त्यामुळे या संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी जेव्हा या जागेची पाहणी केली तेव्हा अधिकारी कोणता निष्कर्ष काढत होते? यावरून सर्व संबंधित अधिकारी बेकायदा बांधकामास परवानगी देण्यात गुंतले होते असा आरोप त्यांनी केला.

मुंबईतील भाजप कार्यकर्ता असलेल्या फॅशन डिझायनरने बंगल्याचे बांधकाम हाती घेतले आहे. राज्य सरकारच्या निषक्रियतेमुळे जुने गोवेतील हेरिटेज परिसरात सुरु असलेल्या या बांधकामा विरोधात गोव्यातील सर्व भागातील आणि सर्व वयोगटातील नागरिक सध्या उपोषणाला बसले आहेत. आमचा आवाज ऐकू यावा यासाठी मी आमरण उपोषण करण्याचाही निर्णय घेतला आहे”, असेही पालेकर पुढे म्हणाले.

Related Stories

विरोधकांचा सभागृहात प्रचंड गदारोळ

Amit Kulkarni

भाजपसमोर आव्हानांचा डोंगर

Amit Kulkarni

गणेश शेटकर यांचे निधन

Amit Kulkarni

एटीके मोहन बागानचा एफसी गोवावर 2-1 असा विजय

Amit Kulkarni

राजीव नाईक यांचा नवदुर्गा हायस्कूलतर्फे गौरव

Amit Kulkarni

लक्ष्मी टेकडीवराल टपरीत दिवसा मिळतेय देशी दारु

Patil_p
error: Content is protected !!