तरुण भारत

कणकुंबी नाक्यावर कोविडमुळे कडक तपासणी सुरू

वाळपई प्रतिनिधी

सध्या कोवीड संदर्भाचा दुसरा रोग आढळून आल्यामुळे कर्नाटक सरकारने यासंदर्भात सतर्कता निर्माण केलेली आहे.अँम्रिकोन हा नवीन रोग आढळून आल्याचे जागतिक पातळीवर स्पष्ट झालेले आहे .यामुळे या रोगाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कर्नाटक सरकारने यासंदर्भात विशेष मोहीम राबविताना गोवा कर्नाटक दरम्यानच्या कणकुंबी भागांमध्ये पुन्हा एकदा तपासणी नाका सक्रिय केलेला आहे. आज दुपारपासून हा नाका पुन्हा एकदा सक्रीय करण्यात आलेला आहे. यावर विशेष अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली असून गोवा राज्यातून कर्नाटक भागांमध्ये जाणाऱया प्रत्येकाची विशेष तपासणी करण्यात येत आहे. ज्यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत त्याना कर्नाटक राज्यामध्ये परवानगी देण्यात येत आहे. मात्र लसीकरणाचा 2 डोस न  घेतलेल्यांना कर्नाटक राज्यमध्ये प्रवेश दिला जात नसल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केलेले आहे. अन्यथा यासाठी आरटीपीसीआर प्रमाणपत्र अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान या संदर्भात सदर अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कर्नाटक सरकारने या संदर्भातील जागरुकता व सतर्कता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा नाका पुन्हा एकदा सक्रिय केलेला आहे. आजपासून सदर नाक्मयावर विशेष अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रत्येक गाडय़ांची तपासणी करण्यात येत होती.

Advertisements

 याबाबत सदर अधिकाऱयांनी सांगितले की गोवा राज्यातून येणाऱया प्रत्येक प्रवासी वर्गाची कडकडीत तपासणी करण्याचे निर्देश खानापूर तालुक्मयाच्या तहसीलदाराने दिलेली आहे. त्याची अंमलबजावणी कडकपणे करण्यात येत आहे .ज्यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले नाही त्यांच्याकडे निदान आरटीपीसीआर तपासणी प्रमाणपत्र असणे अत्यंत गरजेचे आहे . तसे नसल्यास कर्नाटक भागांमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केलेली आहे.

 यामुळे कर्नाटक भागात येणाऱया प्रवासी वर्गाची गैरसोय होऊ नये म्हणून या संदर्भाचे पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केलेली आहे.

Related Stories

रान डुक्करांकडून बार्सेत भातशेतीची नासधूस

GAURESH SATTARKAR

राजदीप नाईकच्या गाडीवरील हल्ला म्हणजे अघोषित आणीबाणी : कामत

Amit Kulkarni

सांखळीचा नगराध्यक्ष आज ठरणार तीनजणांचे अर्ज दाखल

Omkar B

कर्फ्यू कालावधीत 28 पर्यंत वाढ

Patil_p

म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव देणगी कुपन विक्री शुभारंभ

Amit Kulkarni

एनएसजी चे जनरल रानडे डीजीपीना भेटले

Patil_p
error: Content is protected !!