तरुण भारत

सशक्त समाजसाठी साहित्य निर्मितीची गरज

डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन, 28 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनातील प्रकट मुलाखत

 पेडणे-  संत सोहीरोबानाथ आंबिये नगर डविठोबा बगळी

Advertisements

साहित्यिकानी जाती भेदाच्या आणि प्रांत भेदाच्या भिंती ओलांडून वैश्विक दृष्टिकोनातून सशक्त समाज निर्मितीसाठी साहित्य निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक संत श्रे÷ तुकाराम महाराजांचे आठवे वंशज, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

विर्नोडा वळपे येथील श्री संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयात गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे आयोजित केलेल्या 28 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनात आयोजित केलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. संगीता अभ्यंकर यांनी ही मुलाखत घेतली.

सभोवतालच्या पोषक वातावरणाचा आपल्या साहित्यावर परिणाम

एकाच वेळी आध्यात्म, इतिहास आणि तत्वज्ञान याचे विविध पैलू आपल्या साहित्यात दिसतात या प्रश्नावर बोलताना श्री. मोरे म्हणाले, आपल्याला घरात मिळालेले पिढीजात अध्यात्म, संस्कारित वातावरण आणि आधुनिक काळाशी सांगड घालणारे माझे शिक्षण, विविध शास्त्रांचा अभ्यास यांचा कस लावून त्यावर उतरणारे आणि माझ्या सदसद विवेकबुद्धीला पटणाऱया साहित्याची आपण निर्मिती करीत गेलो म्हणूनच माझे लेखन सर्वसमावेशक असे होवू शकले. आपण वयाच्या 17 व्या वषी प्रबंध लिहिला याचे कारण म्हणजे सभोवतालच्या पोषक तसेच वारकरी वातावरणाचा माझ्यावर पडलेला प्रभाव होय. संत तुकारामांचा मी वंशज हे माझे भाग्यच आहे. माझे वडील सुद्धा वारकरी संप्रदायाचे अभ्यासक होते. त्यांच्याकडे आध्यत्मिक पुस्तकांचा खजिना होता. याच खजिन्याचे माझ्यावर संस्कार झाले. संत साहित्यातून आधुनिक जीवनाचे पैलू उघडण्याचे सामर्थ्य मिळाले. संत साहित्याचा तत्कालीन समाज जीवन, राजकारण यांच्यावर कसा पगडा होता हे मी जवळून पहिले त्या अनुभवातून सकस साहित्याची निर्मिती होत गेली. त्या साहित्याला आधुनिकतेचा कस लावत गेलो. त्यामुळेच आपले साहित्य काळाच्या कसोटीवर उतरले. गीतेत मानवी जीवनाचे तत्वज्ञान आहे त्याची आपल्या जगण्याशी  सांगड घातली, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचा इतिहास तुकाराम-महात्मा फुले यांच्या विचारसरणीने प्रभावित

लोकमान्य ते महात्मा या साहित्यनिर्मितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले, ही एक विचारसरणी आहे. सुरुवातीला लोकमान्याच्या महाष्ट्रावर प्रभाव होता मात्र कालानुरूप त्यात बदल घडत घेले. पुरोगामी आणि आधुनिक विचारांचा मेळ या ठिकाणी दिसून येतो. पगडीच्या जागी गांधी टोपी आली, जहाल विचारांवर मवाळ अश्या सर्वस्पर्शी विचारांनी विजय मिळवला. महात्मा फुलेंची आधुनिक विचारसरणीही समाजाला नवी दिशा देणारी आहे त्याचा अवलंब करायला हवा. आधुनिक इतिहास लिहिताना तुकारामाचे विचारही आपण लक्षात घ्यायला हवेत महाराष्ट्राचा इतिहास हा तुकाराम-महात्मा फुले यांच्या विचारसरणीने प्रभावित आहे. तो एकांगी नाही. त्याला दोन पैलू आहेत असे ते म्हणाले. 18 व्या शतकात देखील जगावर राज्य करण्याची क्षमता आमच्यात होतीच त्यात धुमकेतूप्रमाणे प्रभावी वाटणारे गांधींचे तेजस्वी विचार महाराष्ट्राला पटले त्यातून नवीन क्रांती झाली. त्यांचे अहिंसावादी शस्त्र प्रभावी ठरले.

भक्ती आणि शांत रस हा कीर्तनाचा आत्मा

आजच्या आधुनिक बुवांच्या कीर्तनाचा समाचार घेताना ते म्हणाले, आजचे कीर्तन विदुषकी कीर्तन आहे. कीर्तन हे केवळ मनोरंजन किवा समाज प्रबोधन नाही. त्यात समाज बदलण्याची ताकद निश्चितच आहे. राजकारणासाठी त्याचा वापर निश्चितच होवू नये. कीर्तनाला विषयांची बंधने नसली तरी मर्यादा मात्र निश्चित आहेत. त्या मर्यादांचे उल्लघन होवू नये. कीर्तनाचा तमाशा होवू नये असे माझे स्प÷ मत आहे. भक्ती आणि शांत रस हा कीर्तनाचा आत्मा आहे, तो आत्माच हरवत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कवितावर बोलताना ते म्हणाले, कविताही अंतकरणाच्या गाभाऱयातून पुढे यायला हवी प्रसवयाला हवी. त्यातून जगण्याची उर्मी मिळायला हवी. जाती भेदाच्या भिंती साहित्यकिकानी ओलांडायला हव्यात तरच समाज हितैषी साहित्य निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.

सोनाली सावलदेसाई यांनी सूत्रसंचालन केले उमेश गाड यांनी आभार मानले

Related Stories

तिसऱया लाटेसाठी भाजपची आरोग्य स्वयंसेवक मोहीम

Amit Kulkarni

मुंबईत अडचणीच्या ठिकाणी आग विझवण्यासाठी लवकरच फायर बाईक

Abhijeet Shinde

शापोरा नदी पात्रातील पाणी वाढल्याने नदी किनाऱयावरील लोकात घबराट

Omkar B

कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ

Amit Kulkarni

केपेतील खलाशांच्या कुटुंबियांकडून उपोषण

Omkar B

वादी-प्रतिवाद्यांना सादर करावे लागणार प्रतिज्ञापत्र

Amit Kulkarni
error: Content is protected !!