तरुण भारत

चोर्ला घाट परिसरात एसटी-जीप अपघातामुळे वाहतूक ठप्प

वाळपई /प्रतिनिधी

 बेळगाव दरम्यानच्या चोरला घाट  भागातून गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात वाहतुकीच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. यामुळे सातत्याने अपघात घडण्याचे प्रकार वाढू लागले आहे. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एसटी व जीपमध्ये झालेल्या अपघातात सुमारे दीड तास वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडला . यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक मोठय़ा प्रमाणात ठप्प झाली होती. आश्चर्याची बाब अशी  अपघात स्थळावरून अवघ्या आठ किलोमीटरवर केरी या ठिकाणी कार्यरत असलेले पोलिस खात्याची यंत्रणा मात्र वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यास पूर्णपणे निष्फळ ठरली. यामुळे नागरिक व प्रवासी वर्गात तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त करण्यात येत होता .वाहतूक पोलीस खात्याचे पथक केरी तपासणी नाक्मयावर असताना अशा प्रकारे वाहतुकीला अडचणी निर्माण करणे बरोबर आहे का अशा प्रकारचा सवाल प्रवासी वर्गाने केला. यासंदर्भात वरि÷ अधिकाऱयांनी ताबडतोब या संदर्भातील गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केलेली आहे. याबाबतची माहिती अशी की सध्या लग्नसराईचा मोसम सुरू झालेले आहे. यामुळे गोव्यातील नागरिक मोठय़ाप्रमाणात बेळगाव शहरांमध्ये खरेदीसाठी जात असतात . यामुळे चोरला भागातील वाहतुकीच्या प्रमाणात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे .यामुळे पोलिसांची गस्त सदर रस्त्यावर वाढविणे गरजेचे आहे. मात्र या बाबतीत निष्काळजीपणा होत असल्याचा प्रवासी वर्गा?चा आरोप आहे. आज सकाळी कर्नाटक राज्यातील एसटी बस व प्रवासी जीप याच्या दरम्यान  स्पनगंधा हाँटेल नजीक अपघात घडला. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. यामुळे जवळपास दीड तास वाहतूक मोठय़ा प्रमाणात ठप्प झाली होती.बेळगाव भागातून गोव्याकडे येणारी व गोव्याकडून बेळगाव भागात जाणारी वाहने दोन्ही बाजूने मोठय़ा प्रमाणात अडकून पडली होती. त्यामुळे प्रवासी वर्गातून तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त करण्यात येत होता. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला होता. मात्र दहा वाजेपर्यंत पोलीस खात्याचे पथक सदर ठिकाणी न पोहोचल्यामुळे वाहतुकीला व्यत्यय निर्माण झाला.

Advertisements

सदर अपघातात कुणालाही इजा झाली नाही. मात्र दोन्ही बाजूने वाहने मोठय़ा प्रमाणात अडकून पडल्यामुळे प्रवासी वर्गा?ची मोठय़ा प्रमाणात धांदल उडाली. दरम्यान यासंदर्भात प्रवासी वर्गाने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना अपघात स्थळावरुन अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर केरी याठिकाणी वाहतूक पोलीस खात्याची यंत्रणा कार्यरत आहे .मात्र त्यांनी या ठिकाणी ताबडतोब येऊन वाहतूक सुरळीत करण्याची गरज होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष उत्पन्न करण्यात आल्यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रवासी वर्गा?ची धांदल उडाली. प्रवासी वर्गाने यावेळी  बोलताना सांगितले की पोलीस खात्याची वाहतूक यंत्रणा फक्त केरी या ठिकाणी कार्यरत राहण्यासाठी ठेवली आली आहे का अशाप्रकारचा सवाल केला. या वाहतूक यंत्रणेने चोरला संपूर्ण परिसराची देखभाल करणे अत्यंत गरजेचे आहे .मात्र तशा प्रकारची तपासणी होत नसल्याचे प्रवासी वर्गा?चे म्हणणे आहे. या संदर्भात एका ट्रक चालकाकडून अधिक माहिती देताना सांगण्यात आले की गोवा कर्नाटक सीमेवर पोलीस कर्मचाऱयांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र अशा प्रकारची व्यवस्था करण्यात न आल्यामुळे अनेकवेळा घाट परिसरामध्ये वाहतूक ठप होण्याचा प्रकार वारंवार घडत असतो. यामुळे प्रवासी वर्गाला मात्र गंभीर स्वरूपाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असते.

Related Stories

केजरीवालांचे कार्यालयात येणे भाजपला का खुपले?

Amit Kulkarni

मीटर असल्याशिवाय टॅक्सी परवान्याचे नूतनीकरण नाही

Amit Kulkarni

आठवडय़ातभरात अतिमहनीय व्यक्तींचे गोव्यात आगमन

Amit Kulkarni

मडगाव नगरपालिकेचे दयनीय वाहन व्यवस्थापन पुन्हा उघड

Amit Kulkarni

शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करणार

Patil_p

कोरोनामुळे राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी

Omkar B
error: Content is protected !!