तरुण भारत

परराज्यातून येऊन आम्हाला जातीयवादाच्या गोष्टी सांगू नये- डॉ. प्रमोद सावंत

प्रतिनिधी/ म्हापसा

आमचे सरकार पर्यटन क्षेत्र पुढे नेण्यासाठी आहे म्हणून विकासाच्या बाबतीत देशात गोवाराज्य सात वरून तिसऱया क्रमांकावर आले आहे. त्यामुळे इंडिया टुडेचा आम्हाला यावेळी पायाभूत सुविधा, पर्यटन क्षेत्र व सुखमय गोवा हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तुम्ही धर्माच्या नावाने कापून मारले आहे आणि जातीयवाद आणि धर्माच्या गोष्टी आम्हाला सांगतात. आम्ही गोव्यात सर्व धर्मीय भाऊ भाऊ म्हणून एकत्रित राहिलो आहोत. कॉमन सिव्हील पोष्ट आमच्या एकमेव राज्यात आहे. त्यामुळे जातीय भेदाच्या गोष्टी आम्हाला परराज्यातून येऊन गोव्यात सांगू नये. सरकार कसे चालवावे हे आपल्यास दुसऱयांनी येऊन सांगू नये. देवाच्या कृपेने कोविड व्यवस्थापनची प्रगती पाहता आम्ही अग्रेसर आहोत. काहीजणांना राज्याची प्रगती पाहता येत नाही. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय होते हे थोडय़ाना पाहता येत नाही. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने अशा पद्धतीचे पायाभूत विकास व मानवी विकास आम्ही सातत्याने करणार आहोत यासाठी सर्वांचा आम्हाला आशीर्वाद पाहिजे असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हापसा येथे बोलताना केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते तार नदीवरील नवीन पुलाचे भूमीपूजन करण्यात आले. गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (जीएसआयडीसी) 10 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल 4 महिन्यात पूर्ण होईल असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Advertisements

यावेळी व्यासपीठावर म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा, आमदार ग्लेन टिकलो, नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, नगरसेवक प्रकाश भिवशेट, सुशांत हरलमकर, बस्तोडा सरपंच रणजीत उसगावकर, साईनाथ राऊळ, आशीर्वाद खोर्जुवेकर, रायन ब्रागांझा, उपनगराध्यक्ष शेखर बेनकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

म्हापसा वासियांसाठी तसेच बस्तोडा मयडे यांच्यासाठी हा एक चांगला प्रकारचा पूल होणार आहे. सायंकाळच्यावेळी येथे कंजेक्शनची समस्या निर्माण होणार नाही. हा पूल लवकर पूर्ण होणार. एकेकाळी गोव्याची राजधानी म्हणणारे म्हापसा शहराचे विस्तारीकरण होणे काळाची गरज आहे. आजूबाजूच्या पंचायतीही येथे सामील व्हायला पाहिजे. पूर्वीच्या फेरीबोटी येथे म्हापशात लागत होत्या. म्हापसा शहर पूर्णतः डिसीन्टींग होणे गरजेचे आहे. येथे सौंदर्यीकरण होणेही तितकेच गरजेचे आहे. एक चांगल्या प्रकारचे पर्यटन क्षेत्र तार नदीजवळ करता येते. हे एक आकर्षणाचे केंद्र होऊ शकते याबाबत जलसंचायन खाते अभ्यासही करीत आहे. हा बार्देश वासियांसाठी एक चांगला प्रकल्प असेल.

पावसाळय़ापूर्वी पुलाचे काम पूर्ण होणार असून ते पूर्ण होण्यासाठी जनतेचे सहकार्य महत्त्वाचे आहे. योग्य सुशोभीकरण आणि काळजी घेतल्यास म्हापसा नदीच्या किनारी एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आणि स्थानिकांसाठी सभोवतालच्या वातावरणाचा आनंद घेण्याचे ठिकाण बनू शकते. शास्वत नियोजनाद्वारे सरकार संपूर्ण राज्यात अशा पर्यावरणास अनुकूल ठिकाणे सुशोभित करण्याचा प्रयत्न करेल. तार नदी ओलांडून 30 मीटर अंतराचा चारपदरी पूल बांधला जाणे अपेक्षित आहे. ज्यामध्ये पुलाच्या दोन्ही बाजूंनी चॅनेलीकरण संरक्षणात्मक उपाय, रोषणाई आणि वाहतूक बेटाचे बांधकाम समाविष्ट आहे.

योजनेनुसार सध्याचा एकल लेन पूल पाडला जाईल आणि त्याच्या जागी 9 कोटी रुपये खर्चून नवीन पदरी पूल उभारला जाईल. आम्ही नवीन तार पूल बांधण्याची योजना आखली आहे. येत्या 15 दिवसात या प्रकल्पाची निविदा काढली जाईल. पाच ते 6 महिन्यात पूल बांधला जाईल असे जीएसआयडीसीच्या अधिकाऱयाने सांगितले. नवीन पुलासाठी दोन किऑस्क पाडण्याची यापूर्वीची योजना रखडली आहे. नवीन योजनांनुसार पूल अशा प्रकारे बांधला जाईल की कोणतीही बांधकामे पाडावी लागणार नाहीत असे ते म्हणाले. दोन पदरी पुलांपैकी एक पूल आधी बांधला जाईल त्यानंतरच सध्याचा एकेरी पूल पाडून त्या जागी अन्य दुपदरी पुलाचे काम हाती घेण्यात येईल असे ते म्हणाले.

भावी 50 वर्षाचे हीत जपून आम्ही आवाहन पेरले आहे

खूप वर्षांची म्हापसेकर व बस्तोडा वासियांची येथे नवीन पूल बांधावा अशी मागणी होती. तो बांधून लवकर पूर्ण होणार अशी लोकांनी मागणी केली. आपल्यास जीसुडाचे उपाध्यक्षपदही दिले. हा पूल म्हापसा व हळदोणा वासियांना फायदेशीर होणार आहे. सायंकाळच्यावेळी येथे गाडय़ांची गर्दी असल्याने त्याचा त्रास होता. भावी 50 वर्षाचे हीत जपून आम्ही हे एक आवाहन पेरले आहे. असे म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा म्हणाले.

निवडणुकीसाठी अनेकजण डोकेवर काढत आहे– टिकलो

हळदोणचे उमेदवार ग्लेन टिकलो सौझा म्हणाले की, हा पूल पूर्वीचा आहे. स्व. मनोहर पर्रीकर व स्व. फ्रान्सिस डिसोझा यांनी हा पूल बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. हा पूल पोर्तुगीज कालीन असून सर्वांचे हीत लक्षात घेऊन या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. आज अनेकजण निवडणुकीत डेकेवर काढीत आहे मात्र ते स्वतः पूरते पक्षांतर करीत आहे त्याकडे नागरिकांनी लक्ष देऊ नये असे टिकलो यांनी सांगितले. स्वागत बस्तोडा सरपंच रणजीत उसगांवकर तर आभार नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांनी मानले.

विरोधी नगरसेवकांना आमंत्रण नाही

सत्ताधारी गटातील नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. याबाबत विरोधी गटाचे प्रमुख सुधीर कांदोळकर यांना कार्यक्रमास का आला नाही असे विचारले असता हा सत्ताधारी गटांचा व आमदारांचा राजकीय डाव आहे. आम्हाला सर्वांना कुणी बोलावलेही नाही. आम्हाला आमंत्रणच नाही तर तेथे येऊन काय उपयोग अशी माहिती कांदोळकर यांनी दिली. तार नदीजवळ कसला कार्यक्रम होता अशी जाब नगरसेवक आनंद भाईडकर यांनी पत्रकारांना विचारले.

Related Stories

जि.पं.मतदान 12 डिसेंबरला

Patil_p

चंद्रेश्वर भूतनाथ संस्थानात महाशिवरात्री मर्यादित स्वरूपात

Amit Kulkarni

सुर्ला ग्रामपंचायत मुख्यमंत्र्यांमुळे प्रगतीच्या दिशेने

Amit Kulkarni

खनिजमालप्रकरणी निवाडय़ाचे श्रेय घेण्याचा भाजपकडून प्रयत्न

Patil_p

फुटीरांना काँग्रेसची दारे बंदच

Patil_p

काणकोणात पावसाचे थैमान चालूच

Patil_p
error: Content is protected !!