तरुण भारत

माशेल बसस्थनकावर येणाऱया भटक्या गुरांचा बंदोबस्त करा

प्रतिनिधी/ कुंभारजुवे

माशेल येथील फ्ढले, फ्ढळे व भाजी विक्रत्यांना माशेल कदंब बसस्थानकावरील जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. सदर जागेचे प्रवेशद्वार सताड उघडे  असते.  येथे रात्रीच्यावेळी भटकी गुरे येऊन सर्वत्र घाण करतात यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून धंदा करण्यास अडचण निर्माण होत आहे. बसस्थानकावर येणाऱया भटक्या गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील फ्gढले,  फ्ढळे व भाजी विक्रत्यांनी केली.

Advertisements

माशेल बसस्थानकावर ज्या ठिकाणी फ्gढले, फ्ढळे  व भजी विक्रत्यांची सोय केलेली आहे त्या ठिकाणी प्रवेशद्वार व दोन्ही बाजूला असलेल्या घरांना दरवाजे नसल्याने गेट सताड उघडी असतात. परिणमी रात्रीच्यावेळी भटकी गुरे येथे आसऱयासाठी येतात. या परिसरात रात्रभर बसून घाण करतात. परिसरात सर्वत्र मलमुत्र व शेण पसरलेले असल्यामुळे चालणे देखील अवघड बनत आहे. रोज सकाळी विक्रेत्यांना सर्व जागा साफ्ढ करावी लागते. याबाबत माशेल पंचायतीकडे विक्रत्यांनी वारंवार तक्रारी करून  भटक्या गुरांची समस्या सोडवावी अशी मागणी केली आहे. परंतु विक्रत्यांच्या या मागणीकडे पंचायतीने अजून लक्ष दिले नाही अशी खंत येथील विक्रत्यांनी व्यक्त केली.

एकीकडे ग्राहक कमी म्हणून विवंचना, दुसरीकडे परिसरात सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य व त्यात भटक्या गुरांचा उपद्रव,  मालाची होणारी नासाडी यामुळे येथील विक्रेते चिंताग्रस्त बनले आहेत.

माशेल पंचायत किंवा कदंबा परिवहन माहमंडळाने बसस्थानकावर भटकी गुरे येऊन विक्रत्यांना त्रास देतात या प्रकरणी लक्ष घालावे. बसस्थानकावर दरवाजांची सोय करून भटक्या गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील फ्gढले, फ्ढळे व भाजी विक्रत्यांनी केली आहे.

Related Stories

आंचिममध्ये साजरा होणार मास्टर्स ऑफ कंटेम्पररी सिनेमा

Amit Kulkarni

शॅडो कौन्सिलकडून 3 उमेदवारांची घोषणा

Amit Kulkarni

लोबोनी बसस्थानकातील घोटाळा सिद्ध करावा : जोशुआ

Amit Kulkarni

विशांतने साकारली ‘गोवर्धन श्रीकृष्ण ’ माटोळी

Amit Kulkarni

राजकीय सभांवर नियंत्रण हवेच

Amit Kulkarni

कोडार नदीच्या पात्रात बुडून युवकाचा मृत्यू

Amit Kulkarni
error: Content is protected !!