तरुण भारत

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी

कोरोनामुळे पुन्हा भितीचे सावट

प्रतिनिधी/ वास्को

Advertisements

काही राष्ट्रांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने निर्माण केलेल्या धोक्याचे परीणाम भारतावर होऊ नयेत यासाठी देशातील विमानतळांना केंद्र सरकारकडून सावधगीरीच्या सुचना आल्या आहेत. आता आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशाना पुन्हा कोरोनाच्या आरटीपीसीआर तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. दाबोळी विमानतळावर आरटीपीसीआरची कार्यवाही सुरू झालेली असून जगातील बदलणाऱया परीस्थितीचा परीणाम गोव्यातील चार्टर पर्यटक हवाई सेवांवर होण्याची शक्यता बळावली आहे.

कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटने सध्या जगातील काही राष्ट्रांमध्ये धोका निर्माण केलेला आहे. त्यामुळे भारतात या कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी तातडीने पाऊल उचलण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून हवाई तळांवर सर्वांधीक खबरदारी घेण्यात येत आहे. गोव्याच्या दाबोळी विमानतळाला आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात यावी असा आदेश रविवारी रात्री आल्याची माहिती दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलीक यांनी दिली. सध्या कोरोनाने धोका निर्माण केलेल्या राष्ट्रांच्याबाबतीतच ही खबरदारी घेण्यात येणार असून या राष्ट्रांमध्ये यु.के.चाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांसाठी ही सक्ती पूर्वी नव्हती. दाबोळी विमानतळावर उतरणाऱया आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या प्रवाशांना कॉरन्टाईन व्हावे लागणार आहे. शिवाय या रूग्णांचे नमुने व्हेरियंटच्या तपासणीसाठी संबंधीत संस्थेकडे पाठवण्याची सक्तीही करण्यात आलेली आहे. या शिवाय जे देश कोरोनापासूनच्या धोक्याच्या यादीत नाहीत अशा देशांतून विमानतळावर उतरणाऱया हवाई प्रवाशांची प्राथमीक चाचणी संबंधीत हवाई कंपन्यांकडून केली जाणार आहे. त्यापैकी 5 टक्के हवाई प्रवाशांची निवड आरटीपीसीआर तपासणीसाठी करण्यात येणार असल्याची माहिती गगन मलीक यांनी दिली.

चार्टर हवाई वाहतुकीवर परीणाम होण्याची शक्यता

दाबोळी विमानतळावर मागच्या दोन महिन्यांपासून स्थिती सुधारू लागली होती. देशी प्रवाशांबरोबरच विदेशी पर्यटकांचीही संख्या वाढू लागली होती. मात्र, काही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने दाबोळी विमानतळावर पुन्हा आर्थिक व्यवहार रोडावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. येत्या डिसेंबर 29 पासून गोव्यात रशियाहून चार्टर विमाने दाखल होणार आहेत. या विमानांसाठी दाबोळी विमानतळावर 27 स्लॉटस्चे बुकींग झालेले आहे. मात्र, ही विमाने गोव्याकडे उड्डाण करतील की नाही हे जगातील कोविडच्या परिस्थितीवरच अवलंबून असेल असे मत संचालक गगन मलीक यांनी व्यक्त केले. जगातील परिस्थिती बदलत असल्याने केंद्र सरकार नव्याने कार्यपध्दती आखणार आहे. कोरोनाचा प्रश्न गंभीर असल्याने नव्याने मार्गदर्शक तत्वे अमलांत येतील. या सर्व उपाययोजना भारत सरकार आणि भारताकडे उड्डाण करू ईच्छीणाऱया देशांवर अवलंबून असतील असे मलीक म्हणाले.

Related Stories

सांगे नगराध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेणार नाही

Omkar B

उच्च दाबाच्या वीज समस्येवरुन म्हार्दोळवासिय आक्रमक

Patil_p

कोरोना रुग्णांमध्ये बालक, सैनिकांचाही समावेश

Omkar B

पोलिसांना चांगल्या साधन सुविधा मिळणे आवश्यक

Patil_p

‘पर्यावरणीय लेखा व नैतिकता’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Amit Kulkarni

मगो पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार सोपटेंनी आणले विघ्न

Patil_p
error: Content is protected !!