तरुण भारत

‘ओमिक्रॉन’ची सरकारकडून गंभीर दखल

प्रतिनिधी/ पणजी

‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नवीन विषाणू व संसर्गाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून आज मंगळवारी 30 नोव्हेंबर रोजी त्याबाबत पुढील धोरण ठरविण्यासाठी आरोग्य, पोलीस आणि इतर संबंधित खात्याची बैठक बोलवण्यात आली आहे. दरम्यान सरकारतर्फे दाबोळी विमानतळ, रेल्वेस्थानके, बसस्थानके येथे सतकर्ता बाळगण्याचे निर्देश जारी केले आहेत.

Advertisements

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरील माहिती देऊन सांगितले की या संदर्भात केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात येणार असून लोकांनी सावध रहाण्याची गरज आहे.

इतर राज्यातून येणाऱया लोकांपासून तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांपासून गोमंतकीय जनतेने लांब रहावे. पहिली ते सहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत सरकारचा कोणताही निर्णय झालेला नाही. या कोरोनाच्या नवीन विषाणू संसर्गाप्रकरणी काय करायचे, कसे पुढे जायचे ते बैठकीत ठरवण्यात येणार असून त्याची माहिती जनतेला दिली जाणार आहे असे डॉ. सावंत म्हणाले.

सनबर्न पार्टी नाहीच

या वर्षी सनबर्न पार्टी कोणत्याही परिस्थितीत होणार नाही आणि त्यास अनुमती देण्यात आलेली नाही. काहीजण ‘सनबर्न’च्या नावाने लहान पार्टी करण्याच्या तयारीत आहेत ते सरकरला लागत नाही. मोठय़ा धुमधडाक्यात होणारी ‘सनबर्न’ यंदा होणार नाही असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. .

डिसेंबरपासून दाबोळी शिष्टाचारात बदल

केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे गोवा दाबोळी विमानतळावरील शिष्टाचार 1 डिसेंबरपासून बदलण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांना गोव्यात आल्यानंतर कोरोना चाचणी सक्तीची होणार आहे. चार्टर विमानातून येणाऱया प्रवाशांनाही तो नियम लागू होणार असल्याचे विमानतळ संचालक गगन मलिक यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वे स्थानकावरही कोरोना चाचणी सक्तीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Stories

रेल्वे पकडण्यासाठी जीवघेणा प्रवास

Patil_p

मेस्तावाडा वास्कोत घरावर माड कोसळून हानी

Amit Kulkarni

कोरोनाचे 12 बळी, 1420 नवे बाधित

Amit Kulkarni

बोटीवर अडकलेल्या खलाशांना मायदेशी आणण्यासाठी पावले उचलावीत

Omkar B

19 वर्षीय दत्तप्रसाद गावकरचा अपघाती मृत्यू

Amit Kulkarni

गटार कोसळल्यामुळेच रस्ता बंद करावा लागला

Amit Kulkarni
error: Content is protected !!