तरुण भारत

गोव्यात प्रथमच ‘अभाविप’चे कोंकण प्रांत अधिवेशन

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यात प्रथमच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) 56 वे कोंकण प्रांत अधिवेशन दि. 3 ते 5 डिसेंबर असे तीन दिवस पर्वरी येथे होणार आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून असतील. वनवसी क्षेत्रात कार्यरत असलेल्या पद्मश्री डॉ. स्मिता रवींद्र कोल्हे यांचे खास मार्गदर्शन लाभणार आहे. अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांची खास उपस्थिती असणार आहे, असे डॉ. भूषण भावे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Advertisements

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि गोवा मुक्ती संग्रामाला 60 वर्षे पूर्ण होत असल्याच्या गौरवशाली प्रसंगी अधिवेशनात खास प्रदर्शन भरवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. भावे यांनी दिली.

शैक्षणिक धोरणांची दिशा ठरवणार

पर्वरी येथे विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात भरणाऱया या अधिवेश्नात मुंबई, रत्नागिरी, पालघर, पेण, गोवा आदी भागातून 500 सक्रिय कार्यकर्ते एकत्र जमून शैक्षणिक धोरणांची दिशा ठरवणार आहेत.

अभाविपच्या मागणीला राष्ट्रीय धोरणात स्थान

एखाद्या विद्यार्थ्याला आपला अभ्यासक्रम मध्येच स्थगित ठेऊन दुसऱया विषयात शिक्षण सुरू करावयाचे असल्यास त्याला ती मुभा मिळाली पाहिजे, अशी अभाविपची मागणी होती तिला आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणत स्थान मिळाले असल्याचे डॉ. भावे यांनी सांगितले.

सर्व क्षेत्रांतील ओझरते ज्ञान सर्वांना मिळावे

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्याला वाणिज्य व अर्थसंगतचे ज्ञान नसते तर इतर अनेकजण विज्ञानात अनभिज्ञ असतात. अभ्यासक्रमच असा हवा की एका क्षेत्रात निपूण होताना दुसऱया क्षेत्रातील ज्ञानाचा अंश तरी त्यांना मिळायला हवा. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वक्षेत्रातील थोडेफ्ढार ओझरते ज्ञानप्राप्त होईल. सर्वज्ञान परीक्षेसाठीच असायला हवे असे नाही, असे ते म्हणाले.

अभाविपने देशाला श्रेष्ठ नेते दिले ः चौगुले

पत्रकार परिषदेला अधिवेश्नाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष उद्योजक अर्जुन चौगुले उपस्थित होते. अभाविपशी आपला विद्यार्थीदशेपासून संबध असून छात्र शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. अभाविपने अनेक श्रेष्ठ नेते राष्ट्राला दिले, असे ते म्हणाले.

कोकण प्रांताध्यक्षपदी प्रा. श्रीकांत दुधगीकर

 स्वागत समितीचे सहसचिव विलास सतरकर, कोकणप्रांत सहमंत्री प्रभा नाईक व संयोजक संकल्प फ्ढळदेसाई हजर होते. कोकण प्रांताचे अध्यक्ष म्हणून प्रा. श्रीकांत दुधगीकर व सचिव म्हणून अमित धोमसे यांची निवड झाल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

Related Stories

शनिवारी सापडले 180 बाधित

Patil_p

फोंडय़ात मासळी विक्रेते, पालीका मंडळ व मुख्याधिकाऱयांचे एकमत होईना

Omkar B

503 नवे रुग्ण, 688 जण कोरोनामुक्त

Patil_p

मुख्यमंत्रीपदाचे समाधान ‘स्वयंपूर्ण गोवा’ने मिळाले

Omkar B

भाजप सरकार जनसेवेसाठी कटिबध्द : मुख्यमंत्री

Amit Kulkarni

…आणि मडगाव नगराध्यक्षा पूजा नाईक यांचा पारा चढला

Patil_p
error: Content is protected !!