तरुण भारत

आजपासून तीन दिवस पावसाची शक्यता

प्रतिनिधी/ पणजी

ऐन फेस्ता दिवशी देखील गोव्यात जोरदार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. सोमवारी राज्यातील काही भागात पावसाचा हलकासा शिडकावा झाला. गोव्यात आज सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हा पावसाळा तीन डिसेंबरपर्यंत चालेल.

Advertisements

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे व त्याचा परिणाम म्हणून गोव्यात आज सर्वत्रच जोरदार पाऊस पडणार. सोमवारी काही भागात सायंकाळच्या दरम्यान पावसाचा हलकासा शिडकाव झाला. मात्र आजपासून सुरू होत असलेला पाऊस 3 डिसेंबरपर्यंत राहील आणि सर्व दिवसांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱयासह पाऊस पडणार आहे. सध्या समुद्र खवळलेला आहे आणि 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. 2 डिसेंबर रोजी पाऊस पडणार नाही. परंतु दि. 3 डिसेंबर रोजी पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या दरमयान वाऱयाचा वेग वाढणार असल्याने मच्छिमारांनी खोल समुद्रात जाण्याचा प्रयत्न करू नये, असा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे. आज समुद्रातील वाऱयाच्या वाढत्या वेगामुळे समुद्रकाठी राहणाऱयांनी सावधनता बाळगावी. लाटांची उंची वाढण्याची शक्यता आहे.

Related Stories

कोविड निगा केंद्राला विरोध राजकीय प्रेरणेनेच !

Omkar B

200 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद

Patil_p

चंदीगढ महापालिका निवडणुकीत ‘आप’चा 14 जागांवर विजय

Amit Kulkarni

खाणव्यवसाय लवकरात लवकर सुरू करा

Patil_p

प्रियोळच्या विकासावर लघुपट, निबंध स्पर्धा

Amit Kulkarni

खलाशांच्या नातेवाईकांना अटक करणे धक्कादायक

Omkar B
error: Content is protected !!