तरुण भारत

नशेच्या सौदागरांची पोलिसांबरोबर उठबस!

प्रतिनिधी/बेळगाव

गेल्या आठवडय़ात अबकारी अधिकाऱयांनी महांतेशनगर येथील दोघा जणांना अटक करून त्यांच्या जवळून 16 ग्रॅम हेरॉईन जप्त केले होते. स्थानिक पोलिसांना या जोडगोळीचे कारनामे माहिती असूनही ‘मैत्री’ खातर पोलीस अधिकाऱयांनी त्याकडे कानाडोळा केला होता, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली असून माळमारुती पोलीस स्थानकातील अधिकारी संशयाच्या भोवऱयात अडकले आहेत.

Advertisements

गेल्या मंगळवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास वंटमुरी कॉलनीजवळ एका इनोव्हा कारमध्ये हेरॉईन विकणाऱया दोघा जणांना अटक करण्यात आली होती. अब्दुलखादीर अतिक नायक ऊर्फ झिया (वय 25), अकिब सलीम मकानदार (वय 24, दोघेही रा. महांतेशनगर) अशी त्यांची नावे आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ही जोडगोळी अमलीपदार्थ विक्रीच्या व्यवसायात आहे, अशी माहिती मिळाली.

उपलब्ध माहितीनुसार माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात अब्दुलखादीर ऊर्फ झिया व अकिब यांचे वास्तव्य आहे. स्थानिक पोलिसांना त्यांचे कारनामे माहीत होते. मात्र त्याच पोलीस स्थानकातील एका वरि÷ अधिकाऱयाबरोबर झियाची मैत्री आहे. रोज एक, दोनवेळा तो पोलीस स्थानकात येत होता. त्यामुळे त्याने थाटलेला नशेचा व्यवसाय बंद करण्याचे धाडस पोलिसांना झाले नाही.

बेळगाव हे अमलीपदार्थांचे प्रमुख विक्री केंद्र आहे. केवळ बेळगावातच नव्हे तर येथून गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडूसह विविध राज्यांत अमलीपदार्थांची तस्करी केली जाते. ड्रगमाफियांचे कारनामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. एकेकाळी तर आंतरराष्ट्रीय पातळीवर बेळगाव ड्रगमाफियांमुळे ठळक चर्चेत आले होते. आता पुन्हा अमलीपदार्थांची विक्री व तस्करी जोरात सुरू आहे. काही पोलीस अधिकारी तस्करांचे मित्र बनले आहेत. त्यामुळे उघडपणे अमलीपदार्थांची विक्री केली जात आहे, अशी चर्चा सुरू आहे.

नेहमी माळमारुती पोलीस स्थानकात झियाची उठबस होती. अनेक प्रकरणांत मांडवली करण्यासाठी तो पोलीस स्थानकात यायचा. तेथील अधिकाऱयांकडे त्याला चांगलाच मान आहे. त्यामुळे पोलीसही त्याला घाबरत होते. अबकारी अधिकाऱयांनी दोघा जणांना अटक करून 16 ग्रॅम हेरॉईन जप्त केल्यानंतर पोलीस अधिकाऱयांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाविषयी उघडपणे चर्चा होऊ लागली आहे.

अबकारी विभागाने हेरॉईन जप्त केले असले तरी स्थानिक पोलिसांनी किमान या प्रकरणाची चौकशी तरी करायला हवी होती. मात्र मैत्री खातर पोलिसांनी साधी चौकशी करण्याची तसदीही घेतली नाही. वरि÷ अधिकाऱयांपर्यंत या गोष्टी पोहोचू नयेत, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शहर व उपनगरांत मोठय़ा प्रमाणात मटका, जुगार, अमलीपदार्थांची तस्करी आदी गैरधंदे फोफावले आहेत.

या जोडगोळीची चौकशी करून हेरॉईन कोठून आणले? याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. अबकारी अधिकाऱयांनी जर कारवाई केली नसती तर त्यांचा व्यवसाय बिनदिक्कतपणे चालला असता. या कारवाईने माळमारुती पोलीस स्थानकातील काही अधिकाऱयांची भूमिका संशयाच्या भोवऱयात अडकली असून पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी वेळीच या प्रकरणाची दखल घेऊन अमलीपदार्थ विपेते व पोलीस अधिकाऱयांची मैत्री याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.  

ड्रगमाफियांशी मैत्री ठरणार घातक

बेळगाव शहरात शिक्षणासाठी परराज्य व परदेशातून मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांना नशेच्या खाईत लोटण्याचे काम ड्रगमाफिया करत आहेत. खरे तर या ड्रगमाफियांचे कंबरडे मोडून तरुणाईला नशेपासून वाचविण्याची जबाबदारी असणारे पोलीस अधिकारीच अमलीपदार्थ विपेत्यांचे मित्र बनले आहेत. ही मैत्री बेळगावला धोकादायक ठरू लागली आहे. या मैत्रीविषयी आता उघडपणे चर्चा होऊ लागली आहे.

Related Stories

पिस्तुल पुरविणाऱया गडहिंग्लज तालुक्यातील तरुणाला अटक

Patil_p

अलतगा माळीभरम मंदिराचा लोकार्पण सोहळा

Amit Kulkarni

गुडस ग्राम पंचायतीचा क्लार्क एसीबीच्या जाळय़ात

Amit Kulkarni

अनगोळ उद्यमबाग सायकल ट्रक कामाची पाहणी

Patil_p

जमखंडी नगराध्यक्षपदी सिद्दू मिशी

Patil_p

तालुक्यात घुमला विठूनामाचा गजर

Amit Kulkarni
error: Content is protected !!