तरुण भारत

जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांची गर्दी

प्रतिनिधी/ बेळगाव

जन्म-मृत्यू दाखला मिळविण्यासाठी महानगरपालिका कार्यालयात गर्दी होत आहे. सेवासिंधूच्या माध्यमातून जरी मृत्यू दाखला मिळत असला तरी अद्याप लोकांना तितकीशी माहिती नसल्याने ते महानगरपालिकेत दाखल होत आहेत. यामुळे गर्दी होत आहे. सोमवारी आठवडय़ाचा पहिलाच दिवस असल्याने गर्दी दिसून आली.

Advertisements

यापूर्वी केवळ महानगरपालिकेतच जन्म व मृत्यू दाखले देण्यात येत होते. यामुळे महानगरपालिकेमध्ये बरीच गर्दी होत होती. दाखले देण्यास वेळ लागत होता. त्यामुळे सेवासिंधूच्या माध्यमातून सेवा केंद्रांवर मृत्यू दाखला उपलब्ध करून देण्याचा निर्णय मनपाने घेतला. जन्म दाखल्यासाठी मनपामध्ये नोंदणी आवश्यक आहे. परंतु याबद्दल अद्याप जागृती नसल्याने नागरिक मनपा कार्यालयात दाखल होत आहेत. याठिकाणी आल्यानंतर त्यांना सेवासिंधूची माहिती मिळत आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून जागृती होणे आवश्यक आहे.

Related Stories

संकेश्वरात ‘बाप्पा’ चे जल्लोषी स्वागत

Patil_p

बारवाड नदी संगमावरील घाटाची दयनीय अवस्था

Patil_p

लोकमान्य सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा

Omkar B

चव्हाण, ग्रामीण, एसआरएस, आरोही, एसजी स्पोर्ट्स विजयी

Amit Kulkarni

आर.व्ही.देशपांडे यांच्याकडून प्रचाराचा धडाका

Amit Kulkarni

पत्रकाराच्या कुटुंबीयांना पालकमंत्र्यांकडून आर्थिक मदत

Omkar B
error: Content is protected !!