तरुण भारत

शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला नाही

प्राथमिक-माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisements

राज्यातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत चर्चा सुरू झाली असतानाच अफवांना उत आला आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आतापर्यंत शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. सध्या तरी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला नाही. राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळलेला नाही. तरी देखील अधिक खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे पालकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही, असे मंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले आहे.

तुमकूर येथे सोमवारी पत्रकारांशी ते बोलत होते. सध्या शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. आगामी दिवसांत कोविड तांत्रिक सल्लागार समितीने सल्ला किंवा सूचना केल्यास मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्री म्हणाले.

राज्यात 48 हजार प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत. कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याबरोबरच त्यांच्या आरोग्यावरही अधिक लक्ष ठेवण्यात आले आहे. शाळांना आरोग्यविषयक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे. दररोज अर्धा किंवा एक तासातून एका शिक्षण खात्याच्या उपसंचालकांकडून अहवाल मागविला जात आहे. ही माहिती कोविड तांभिक सल्लागार समितीलाही देण्यात येत आहे. अनेकांनी मास्क वापरणेच सोडून दिले आहे. मुलांनी शाळेत आणि शाळेतून घरी जाताना सक्तीने मास्क वापरण्याच्या सूचना शिक्षकांनी द्याव्यात, असेही ते म्हणाले.

धारवाड वैद्यकीय महाविद्यालय, बेंगळूरमधील वसती शाळेत कोरोनाबाधित विद्यार्थी आढळले आहेत. रविवारी म्हैसूरमधील पदवीपूर्व महाविद्यालयातील वसतीगृहात मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यांना क्वारंटाईन करून उपचार केले जात आहेत. उर्वरित कोठेही अशा प्रकरणांची नोंद झालेली नाही.  प्राथमिक आणि माध्यमिक शालेय पातळीवर कोठेही कोरोना प्रकरणाची नोंद झालेली नाही, असे शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी स्पष्ट केले.

Related Stories

कर्नाटक: सीरा पोटनिवडणूक: टी. बी. जयचंद्र कॉंग्रेसचे उमेदवार

Abhijeet Shinde

दहावी ऑक्सिजन एक्स्प्रेस दाखल

Amit Kulkarni

कर्नाटक: मुख्यमंत्र्यांकडून निपाणी तालुक्यातील पुरस्थितीची पाहणी; मदतीचे आश्वासन

Abhijeet Shinde

पदवीसाठी 23 पासून प्रवेश प्रक्रिया

Amit Kulkarni

टूलकिट प्रकरण: दिशा रवीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Abhijeet Shinde

कंबळवीर श्रीनिवास गौड यांचा विक्रम मोडीत

Patil_p
error: Content is protected !!