तरुण भारत

‘स्थानिक स्वराज्य’ची डिसेंबरमध्ये रणधुमाळी

27 डिसेंबरला मतदान, 30 रोजी निकाल, अथणी, बोरगाव, एकसंबासह राज्यातील 58 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक

प्रतिनिधी/निपाणी

Advertisements

मुदत संपलेल्या राज्यातील 58 नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार या 58 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 27 डिसेंबर रोजी मतदान तर 30 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना 8 डिसेंबरपासून जारी होणार आहे. अथणी, उगारखुर्द नगरपरिषद, निपाणी तालुक्मयातील बोरगाव, चिकोडी तालुक्मयातील एकसंबा नगरपंचायतींसह जिह्यातील 16 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक जाहीर झाल्याने विधान परिषदेनंतर या निवडणुकांचा धुरळाही स्थानिक पातळीवर उठणार आहे.

राज्यातील चिक्कमंगळूर, गदग-बेटगेरी, होस्पेट, शिरा या नगरपालिका तसेच अथणी, अन्नीगेरी आणि बंकापूर या नगरपरिषद अशा 7 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका 2013 साली झाल्या होत्या. त्यांचा कालावधी पूर्ण होऊन तीन वर्षे झाली तरी अद्याप निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या. या ठिकाणी निवडणुका घेण्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर याविरोधात काहींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्याच्या सुनावणीत बराच वेळ गेल्याने गेली तीन वर्षे सभागृहाविनाच या संस्था होत्या. आता या ठिकाणी पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे.

तसेच 2016 साली पंचवार्षिक निवडणुका झालेल्या व यंदा मुदत संपलेल्या 51 नगरपरिषद व नगरपंचायत यांचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. हा कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी नियमावलीदेखील दिली आहे. त्यानुसार नगरपालिका निवडणूक लढवणाऱया उमेदवारासाठी 2 लाख, नगरपरिषदेसाठी 1.5 लाख व नगरपंचायतीसाठी अधिकाधिक 1 लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा आयोगाने घातली आहे.

विधानपरिषद मतदानाची संधी हुकली

दरम्यान उच्च न्यायालयाने सदर 58 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 30 डिसेंबरपूर्वी निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. सध्या जिह्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशावेळी जिह्यातील 16 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झाल्या नसल्याने तेथील विधानपरिषदेचे मतदान कमी झाले. विधानपरिषदेच्या मतदानापूर्वी या निवडणुका झाल्या असत्या तर येथील नवनिर्वाचित सदस्यांना मतदानाची संधी होती. मात्र ही संधी हुकली आहे.

Related Stories

आर. टी. लक्कनगौडर यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

Rohan_P

झोपडपट्टतील नागरिकांना आहारधान्य वितरण

Patil_p

कर्नाटकात धोका वाढला : २४ तासात ६१२८ पॉझिटिव्ह तर ८३ जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

अंकलीत रेणुका देवी यात्रा उत्साहात

Omkar B

कर्नाटकात पेट्रोल, डिझेलवरील कर 7 रुपयांनी स्वस्त

Abhijeet Shinde

बदलत्या हवामानाचा काजू उत्पादकांना फटका

Amit Kulkarni
error: Content is protected !!