तरुण भारत

व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार आज नौदल प्रमुख म्हणून पदभार स्विकारणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशाचे नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार आज पदभार स्वीकारतील. अ‍ॅडमिरल करमबीर सिंग आज (30 नोव्हेंबर) निवृत्त होत असल्याने यांच्याकडून आर हरी कुमार दिल्लीत पदभार स्वीकारणार आहेत. सध्या ते वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ आहेत.

Advertisements

12 एप्रिल 1962 ला जन्मलेल्या हरी कुमार यांनी व्हाइस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, चीफ ऑफ पर्सनल, द फ्लॅग ऑफिसर कमांडिंग वेस्टर्न फ्लीट अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते गोवा नेव्हल वॉर कॉलेजचे कमांडंट राहिले आहेत आणि सेशल्स सरकारचे नौदल सल्लागारही राहिले आहेत. हरी कुमार यांनी भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराटचेही नेतृत्व केले आहे. नौदलाचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणाऱया मुंबईस्थित डब्ल्यूएनसीची सूत्रे कुमार यांनी यावषी फेब्रुवारीमध्ये हाती घेतली.

मुंबई विद्यापीठातून डिफेन्स अँड स्ट्रटेजिक स्टडीजमध्येमध्ये त्यांनी एमफिल केले आहे. केरळच्या तिरुवनंतपूरममध्ये जन्मलेल्या कुमार यांनी सुरवातीचे शिक्षण मन्नम मेमोरियल रेसिडेन्शिअल हायस्कूलमधून घेतले. यानंतर त्यांनी तिरुवनंतपूरमच्या सरकारी कला महाविद्यालयातून प्री-डिग्री कोर्स केला. 1979 मध्ये त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 61 व्या कोर्समध्ये भाग घेतला आणि त्यांना ज्युलिएट स्क्वाड्रन देण्यात आले. 1981 मध्ये त्यांनी एनडीएमधून पदवी प्राप्त केली.

Related Stories

केरळमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यु

Patil_p

शेतकरी नेत्याच्या हत्येचा कट उघडकीस

Patil_p

इन्फोसिसचे बाजार भांडवल 7 लाख कोटींवर

Patil_p

24 तासात दीड लाखांहून अधिक रुग्ण

Patil_p

रामाची भूमिका करणाऱ्या मुस्लिमाला जीवे मारण्याची धमकी

Patil_p

उग्रवादी संघटनांकडून आसाममध्ये जाळपोळ

Patil_p
error: Content is protected !!