तरुण भारत

भारतीय वंशाचे पराग अग्रवाल होणार Twitter चे CEO; भारतीयांचा दबदबा कायम

ऑनलाईन टीम / तरुण भारत

जगातील सर्वाधिक महत्त्वाच्या असणाऱ्या गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅडॉब, आयबीएम, पालो अॅल्टो नेटवर्क यांसारख्या कंपन्यांमध्ये भारतीयांनी आपले कौशल्य पणाला लावत आपला दबदबा निर्माण केला आहे. यातच आता भर पडणार असुन आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी पराग अग्रवाल हे आता ट्विटरची धुरा संभाळणार आहेत. जगात नेहमी चर्चेत असणारी आणि अनेक महत्त्वाच्या व्यक्ती व्यक्त होण्यासाठी वापरत करत असलेल्या कंपनीपैकी एक आहे.

जगभरात चर्चा घडवून आणणाऱ्या ट्विटरने सोमवारी खांदेपालटासंदर्भात घोषणा केली. ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी सीईओ पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्यानंतर ट्विटरचे उत्तराधिकारी म्हणून भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांना नियुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीने केल्याने भारतीयांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. याच पार्श्वभुमीवर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे आणि ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार बनवणाऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे सर्वोसर्वा एलॉन मस्क यांनीही प्रतिक्रिया नोंदवलीय. भारतीयांच्या कौशल्याचा अमेरिकेला फार फायदा होतोय,” असे ते म्हणत आहेत.

तंत्रज्ञानाच्या जगात भारतीयांचे हे यश कमालीचं आहे. यामधून अमेरिका विस्थापितांना किती संधी देते हे दिसून येतं, असं एक ट्विट पॅट्रीक कोलीसन यांनी पराग यांची ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती होण्याच्या घोषणेनंतर केलं. हे ट्विट सध्या व्हायरल झालं असून ११ हजारांहून अधिक जणांनी ते रिट्विट केलंय. या निमीत्ताने जागतिक तंत्रज्ञानविषयक कंपन्यांच्या ‘सीईओ’पदी अनेक भारतीय विराजमान आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, ‘आयबीएम’चे अरविंद कृष्ण, ‘अ‍ॅडोब’चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचेही नाव या यादीत समाविष्ट झाले असल्याने जागतिक तंत्रज्ञानविषयक कंपन्यांच्याद्वारे आपला दबदबा कायम ठेवला आहे.

Advertisements

Related Stories

कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक

Rohan_P

छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय सुरु होणार

Abhijeet Shinde

बंगाल हिंदुस्थानला पाकिस्तान किंवा तालिबान होऊ देणार नाही – ममता बॅनर्जी

Abhijeet Shinde

नूतन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील क्वारंटाईन

Abhijeet Shinde

सलमान, आमिर, शाहरुखचीही चौकशी करा!

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये 180 क्रूड बॉम्ब हस्तगत

Patil_p
error: Content is protected !!