तरुण भारत

आर हरी कुमार यांनी स्विकारली नौदल प्रमुखपदाची सूत्रे

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार यांनी आज नौदल प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. हा पदभार स्विकारण्यापूर्वी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ने सन्मानित करण्यात आले. अ‍ॅडमिरल करमबीर सिंग आज (30 नोव्हेंबर) निवृत्त झाले. त्यांच्याकडून आज आर हरी कुमार यांनी नौदल प्रमुखपदाची सूत्रे स्विकारली. एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालयाचा भाग म्हणून बांधलेल्या थिएटर कमांड स्ट्रक्चरच्या मूळ स्थापनेत अ‍ॅडमिरल आर हरी कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Advertisements

आर हरी कुमार यापूर्वी नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ होते. 12 एप्रिल 1962 ला जन्मलेल्या हरी कुमार यांनी 39 वर्षांच्या कारकिर्दीत व्हाइस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, चीफ ऑफ पर्सनल, द फ्लॅग ऑफिसर कमांडिंग वेस्टर्न फ्लीट अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते गोवा नेव्हल वॉर कॉलेजचे कमांडंट राहिले आहेत आणि सेशल्स सरकारचे नौदल सल्लागारही राहिले आहेत. हरी कुमार यांनी भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराटचेही नेतृत्व केले आहे. नौदलाचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणाऱया मुंबईस्थित डब्ल्यूएनसीची सूत्रे कुमार यांनी यावषी फेब्रुवारीमध्ये हाती घेतली. याशिवाय त्यांनी कर्मचारी आणि थेट नियुक्त्यांमध्येही काम केले आहे. त्यांच्या कमांडमध्ये एनएसएस निशांक, मिसाइल कॉर्वटे, एनएसएस कोरा आणि गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर इन्स रणवीर यांचा समावेश आहे.

मुंबई विद्यापीठातून डिफेन्स अँड स्ट्रटेजिक स्टडीजमध्येमध्ये त्यांनी एमफिल केले आहे. केरळच्या तिरुवनंतपूरममध्ये जन्मलेल्या कुमार यांनी सुरवातीचे शिक्षण मन्नम मेमोरियल रेसिडेन्शिअल हायस्कूलमधून घेतले. यानंतर त्यांनी तिरुवनंतपूरमच्या सरकारी कला महाविद्यालयातून प्री-डिग्री कोर्स केला. 1979 मध्ये त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 61 व्या कोर्समध्ये भाग घेतला आणि त्यांना ज्युलिएट स्क्वाड्रन देण्यात आले. 1981 मध्ये त्यांनी एनडीएमधून पदवी प्राप्त केली.

Related Stories

‘1 जिल्हा, 1 प्राधान्य’योजनेची तयारी

Patil_p

सैनिकाच्या स्वागतासाठी ‘पसरले’ हात

Patil_p

मद्यपेमींना पुन्हा झटका

Patil_p

पश्चिम बंगाल निकालाचा अन्वयार्थ…

Patil_p

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना फोन, म्हणाले…

Abhijeet Shinde

खंडेराया-म्हाळसा विवाहसोहळा संपन्न :विवाहसोहळा संपन्न

Sumit Tambekar
error: Content is protected !!