तरुण भारत

गुजरातमध्ये कलम ३७० च्या नावाने भरणार क्रिकेट टुर्नामेंट

ऑनलाईन टीम/तरुण भारत

गुजरातच्या गांधीनगरमध्ये कलम ३७० च्या नावाने क्रिकेट टुर्नामेंट खेळवली जाणार असून अमित शाह यांनीच ही कल्पना मांडली होती!
जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं राज्यघटनेचं कलम ३७० केंद्र सरकारने २०१९ मध्ये हटवलं. आता कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला २ वर्ष पूर्ण होत असताना गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० नावाने क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याची कल्पना मंडळी आहे. गुजरातमध्ये या क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गांधीनगर या लोकसभा मतदारसंघात ही क्रिकेट टुर्नामेंट होणार आहे. तरुण मतदारांना अधिकाधिक प्रमाणात भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी कलम ३७० च्या नावाने ही टुर्नामेंट आयोजित केल्याचं भाजपाचे गांधीनगर लोकसभा मतदारसंघ इनचार्ज हर्षद पटेल यांनी सांगितलं आहे. येत्या डिसेंबर महिन्यात ही टुर्नामेंट खेळवली जाणार आहे.

Advertisements

Related Stories

प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजानचा रस्ते अपघातात मृत्यू

Rohan_P

देशात 17,407 नवे कोरोनाबाधित; 89 मृत्यू

Rohan_P

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात!

Rohan_P

करण जोहरच्या घरातील दोन सदस्यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

पंजाबचे मंत्री तृप्त राजिंदर सिंह बाजवा यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचं कोरोनामुळं निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!