तरुण भारत

BMC चा मोठा निर्णय; पहिली ते चौथीचे वर्ग बंदच राहणार

ऑनलाईन टीम / मुंबई :

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एक डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने थैमान घातल्याने जगाची चिंता वाढली आहे. भारतानेही या व्हेंरिएंटचा धसका घेतला असून, त्याला रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या बैठकीत पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तर पहिले ते चौथीचे वर्ग बंदच राहणार आहेत.

Advertisements

मुंबई महापालिका पहिली ते चौथीचे वर्ग तुर्तास सुरू करणार नाही. पालिकेच्या शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव तयार केला असून, तो मंजुरीसाठी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच परिस्थिती पाहून यासंदर्भात येत्या दहा दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे.

दरम्यान, ओमिक्रॉनची अजून राज्याला भीती नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. या मुद्यावर मुख्यमंत्र्यांसमेवत आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सची बैठक झाली. त्यानुसार, 1 डिसेंबरला ठरल्याप्रमाणे शाळा सुरू होतील, असेही राजेश टोपे यांनी सांगितले होते. मात्र, ओमिक्रॉनच्या भीतीने मुंबईत पालिकेच्या शिक्षण विभागाने पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार नसल्याचे सांगितले आहे.

Related Stories

नव्या कोरोना व्हेरिएंटबाबत पंतप्रधान मोदींनी घेतली तातडीची बैठक

Sumit Tambekar

शालेय स्तरावरावर जातीचा दाखला मिळण्यासाठी कालावधी वाढवून द्या…

Sumit Tambekar

स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 साठी सातारा पालिकेची अफलातून स्पर्धा

Patil_p

शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीन सीमेवरील सैन्य माघारी परतणार : राजनाथ सिंह

Rohan_P

सांगली : कोरोनाचा सतरावा बळी, नवे 15 रूग्ण

Abhijeet Shinde

यड्रावातील ५०० परप्रांतीय मुळगावी रवाना

Abhijeet Shinde
error: Content is protected !!