तरुण भारत

सांगली : सह्याद्रीनगर रेल्वे उड्डाण पूल १ तारखेपासून बंद

कुपवाड फाटा ते विश्रामबाग नव्या पुलावरुन पर्यायी वाहतूक

सांगली : प्रतिनिधी

येथील सह्याद्री नगर येथील रेल्वे उड्डाण पूल नव्याने बांधकामासाठी बुधवार १ डिसेंबर पासून वाहतुकीस बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. पर्यायी वाहतूक लक्ष्मी मंदिर कुपवाड फाटा ते नवे विश्रामबाग पूल अशी करण्यात येणार आहे.

विश्रामबाग ते माधवनगर-जिल्हा परिषद अध्यक्षांचे वसंत हे शासकीय निवासस्थान ते रत्ना हॉटेल चौक सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृहा जवळील पुलाचे नवीन बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याने ही वाहतूक नव्या पुलावरुन वळवण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली आहे. ही अधिसूचना दि. 1 डिसेंबर 2021 रोजी पासून ते पुढील आदेशापर्यंत अंमलात राहील. त्यामुळे नागरिकांनी बदललेल्या मार्गावरुनच वाहतूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

गणेशोत्सवानिमित्त सांगलीत पोलिसांचे संचलन

Abhijeet Shinde

जयसिंगपुरची कन्या झाली अमेरिकेतील होपटाऊनची नगरसेविका

Sumit Tambekar

आदमापूर येथे होणारा संत बाळुमामा भंडारा उत्सव रद्द

Abhijeet Shinde

कोरोना काळात औषधांचा काळाबाजार निदर्शनास आल्यास कारवाई करणार

Abhijeet Shinde

इस्लामपूरचे माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांचे निधन

Abhijeet Shinde

खानापूरच्या नगराध्यक्षपदी स्वाती टिंगरे बिनविरोध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!