तरुण भारत

राज्यात शंभर टक्के सत्ताबदल होणार – प्रवीण दरेकर

प्रतिनिधी / सांगली

राज्यातील शेतकरी अस्वस्थ आहेत. महिला असुरक्षित आहेत. खून, दरोडा, अत्याचारात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत. सातत्याने बलात्कार, विनयभंगाच्या घटना घडत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एकूणच राज्य सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केली. दिल्लीतील आंदोलनात शेतकऱ्यांच्या बळीचे भांडवल करणाऱ्या संजय राऊत यांनी ४३ एसटी कर्मचाऱ्यांचे बळी गेले. या पापाचे धनी कोण याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही त्यांनी यावेळी बोलताना केले.

दरम्यान राज्यात लवकरच सत्ताबदल होईल असे भाकितही त्यांनी यावेळी बोलताना केले. दरेकर म्हणाले, गेल्या दोन वर्षात राज्याला मागे नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. महापूर, अतिवृष्टीने बाधित शेतकरी, व्यापाऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत मिळाली आहे. अनेक जण अजूनही मदतीपासून वंचित राहिलेले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा विलीनीकणासाठी संप सुरू आहे. हा प्रश्न समन्वयातून सोडविण्याची गरज आहे. कामगार संघटनाशी चर्चा न करता थेट कर्मचाऱ्यांशी चर्चा हवी, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

Advertisements

Related Stories

नांदेड पोलीस हल्ला : 400 जणांवर गुन्हा दाखल; 17 जणांना अटक

Rohan_P

ममता बॅनर्जी-शरद पवार भेटीवर संजय राऊत म्हणतात…

Abhijeet Shinde

ब्रिटनहून भारतात परतलेल्या 20 जणांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन

datta jadhav

महाराष्ट्रात दिवाळीनंतरच शाळा सुरू होणार : वर्षा गायकवाड

Rohan_P

ऐनवरेत जनावरे वाहतूक; दोघांवर गुन्हा, टेम्पो जप्त

Abhijeet Shinde

जम्मू-काश्मीर : सीमाभागात ड्रोनच्या मदतीने टाकण्यात आलेली शस्त्रास्त्रे जप्त

datta jadhav
error: Content is protected !!